हातातून निसटतोय वर्ल्डकप?, न्यूझीलंडविरुद्ध मॅच जिंकली, पण 4 चुकांनी टीम इंडियाची पोलखोल, मोठी
टीम इंडियाने अनेक झेल सोडले इंड विरुद्ध न्यूझीलंड 1ली T20 : वनडे मालिकेत न्यूझीलंडकडून 2-1 असा पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघाने पहिल्या टी-20 सामन्यात दमदार पुनरागमन करत 48 धावांनी शानदार विजय मिळवला. फलंदाजी आणि गोलंदाजीत टीम इंडियाने वर्चस्व गाजवले असले, तरी या सामन्यात एक मोठी कमकुवत बाजू पुन्हा एकदा उघड झाली आणि त्यामुळे चाहते चिंतेत पडले आहेत. अवघ्या 20 दिवसांवर येऊन ठेपलेल्या 2026 टी20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर ही चूक भारताला महागात पडू शकते.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय खेळाडूंची फील्डिंग अत्यंत निराशाजनक ठरली. सामन्यादरम्यान अनेक सोपे कॅच हातातून सुटले, तसेच एक सोपा रनआउटही झाला नाही. जरी 239 धावांचा मोठा लक्ष्य असल्याने या चुकांचा निकालावर फारसा परिणाम झाला नाही, तरी कमी धावांच्या सामन्यात अशा चुका संघासाठी घातक ठरू शकतात.
सोपे कॅचही हातातून सुटले…
19व्या षटकात मिचेल सँटनर अर्शदीप सिंगच्या चेंडूवर मोठा फटका मारताना डीप मिडविकेटवर ईशान किशनने अगदी सोपा कॅच सोडला. याआधी 11व्या षटकात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर स्क्वेअर लेगवर रिंकू सिंगकडून मार्क चॅपमनचा उंच कॅचही सुटला. या चुकांमुळे चॅपमनला जीवनदान मिळाले.
संजू सॅमसनकडूनही चुका
सामन्याच्या पहिल्याच षटकात संजू सॅमसनने एक अप्रतिम कॅच घेतला होता. मात्र त्यानंतर त्याच्याकडून एक कॅच सुटला आणि रनआउटची संधीही हुकली. रिंकू सिंगने केलेल्या अचूक थ्रोवर ग्लेन फिलिप्स सहज रनआउट होऊ शकला असता, पण संजूला चेंडू नीट पकडून स्टंप्स उडवता आल्या नाहीत.
धक्कादायक आकडेवारी
कधीकाळी जगातील सर्वोत्तम फील्डिंग करणाऱ्या संघांपैकी एक असलेला भारत आता या विभागात पिछाडीवर जाताना दिसतो आहे. आशिया कप 2025 पासून आतापर्यंत भारतीय संघाने तब्बल 26 कॅच सोडले आहेत. टी-20 वर्ल्ड कपच्या तोंडावर ही आकडेवारी निश्चितच चिंताजनक असून, संघ व्यवस्थापनासाठी ही मोठी इशाराची घंटा आहे.
भारताचे क्षेत्ररक्षण अत्यंत खराब आहे. त्यांनी आज अनेक झेल सोडले आहेत. आज 6-8 झेल सोडले. यातील काही झेल निरपेक्ष सिटर्स होते. भारत सध्या क्षेत्ररक्षणात सर्वात वाईट संघ आहे
— आर्यन गोयल (@Aryan42832Goel) 21 जानेवारी 2026
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.