अर्शदीपवर अखेर दंडात्मक कारवाई!
टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिचेलला चेंडू फेकून मारल्याच्या घटनेनंतर आयसीसीने त्याच्या सामन्याच्या मानधनातून 15 टक्के रक्कम कपात केली असून, शिस्तभंग नोंदीत एक दोष गुणही जोडला गेला आहे. अहमदाबाद येथे झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या डावातील अकराव्या षटकात ही घटना घडली. गोलंदाजी पूर्ण केल्यानंतर अर्शदीपने फॉलो थ्रूमध्ये कारण नसताना चेंडू परत फेकला. तो मिचेलच्या मांडीला लागला. या प्रकाराला आयसीसीच्या आचारसंहितेतील कलम 2.9 अंतर्गत उल्लंघन मानण्यात आले आहे. या नियमानुसार सामन्यादरम्यान एखाद्या खेळाडूकडे धोकादायक किंवा अयोग्य पद्धतीने चेंडू किंवा अन्य साहित्य फेकणे चुकीचे मानले जाते. मैदानावरील पंच इलिंगवर्थ आणि व्हार्फ, अलाउद्दीन पालेकर तसेच एड्रियन होल्डस्टॉक यांनी ही तक्रार नोंदवली होती.
Comments are closed.