टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला सोपा गट! सूर्याच्या नेतृत्वाखाली भारत कोणत्या दिवशी कोणत्या टीमविरुद्ध खेळणार,जाणून घ्या सविस्तर
भारत आणि श्रीलंकेच्या संयुक्त यजमानपदाखाली टी-20 वर्ल्ड कप 2026 पुढील वर्षी होणार आहे. असा अंदाज आहे की स्पर्धेची सुरुवात 7 फेब्रुवारीला होईल आणि अंतिम सामना 8 मार्चला खेळला जाईल. सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वात भारतीय संघ आपला किताब राखण्यासाठी मैदानात उतरेल. क्रिकबजच्या माहितीनुसार, 20 संघांना चार गटांमध्ये विभागण्यात आले आहे. प्रत्येक गटात पाच संघांचा समावेश आहे.
या वेळी टीम इंडियाला तुलनेने सोपा गट मिळाला आहे. भारतासोबत या गटात पाकिस्तान, नेदरलँड्स, नामिबिया आणि अमेरिका या संघांचा समावेश आहे. टीम इंडिया आपला मोहिमेची सुरुवात 8 फेब्रुवारीला अमेरिकेविरुद्ध करेल. त्यानंतर 12 फेब्रुवारीला सूर्याच्या नेतृत्वाखालील संघ दिल्लीमध्ये नामिबियाशी सामना खेळेल. भारत-पाकिस्तान यांचा महामुकाबला 15 फेब्रुवारीला होणार आहे, तर 18 फेब्रुवारीला टीम इंडियाची नेदरलँड्सशी लढत होईल.
Comments are closed.