'प्रामाणिकपणे सांगायचे तर…', टीम इंडियाच्या विजयानंतर किंग कोहलीचे हृदयस्पर्शी वक्तव्य
दुबईच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात विराट कोहलीने अखेर आपली लय मिळवली. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा ग्रुप-अ सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात 23 फेब्रुवारी रोजी दुबईच्या मैदानावर खेळवण्यात आला. टीम इंडियाने हा सामना एकतर्फी 6 विकेट्सने जिंकला, तर विराट कोहलीने नाबाद शतक झळकले. या सामन्यात कोहलीने चौकार मारून आपले शतक पूर्ण केले आणि टीम इंडियासाठी विजयी धावही काढली. कोहलीला त्याच्या शानदार खेळीसाठी सामनावीराचा किताबही मिळाला, ज्यामध्ये त्याने कबूल केले की तो स्वतः या खेळीची खूप दिवसांपासून वाट पाहत होता.
पाकिस्तानविरुद्धच्या शानदार विजयानंतर विराट कोहलीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रामाणिकपणे सांगायचे तर, उपांत्य फेरी गाठण्यासाठी हा एक अतिशय महत्त्वाचा सामना होता, ज्यामध्ये चांगली खेळी खेळल्यानंतर मला बरे वाटत आहे. हा असा सामना होता ज्यामध्ये आम्ही रोहितची विकेट लवकर गमावली. ज्यामध्ये आम्हाला सावधगिरीने पुढे जावे लागले. माझे काम जास्त जोखीम न घेता मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजांविरुद्ध धावांचा प्रवाह चालू ठेवणे होते. शेवटी, श्रेयसने काही मोठे शॉट्स खेळले आणि मीही काही चौकार मारण्यात यशस्वी झालो. या सामन्यात मला एकदिवसीय सामन्यांमध्ये जसे खेळायचे आहे तसे खेळण्याचे स्वातंत्र्य मिळाले. मला माझा खेळ चांगलाच माहिती आहे, म्हणून मी बाहेरील आवाजापासून (टीकाकार) स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. माझे काम मैदानावरील प्रत्येक चेंडूवर माझे 100 टक्के देणे होते. शुबमनने शाहीनविरुद्ध खूप चांगली फलंदाजी केली, ज्यामुळे माझ्यावरील दबाव बऱ्याच प्रमाणात कमी झाला.
भारतीय संघाला आता चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये त्यांचा पुढचा सामना 2 मार्च रोजी दुबईतील त्याच मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे. यामुळे टीम इंडियाला कमीत कमी एका आठवड्याचा मोठा ब्रेक मिळाला आहे. याबद्दल विराट कोहली म्हणाला की, प्रामाणिकपणे सांगायचे तर, वयाच्या 36 व्या वर्षी एका आठवड्याचा ब्रेक मिळणे खरोखर चांगले वाटते. प्रत्येक सामन्यात अशी मेहनत देण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते म्हणून मी आता काही दिवस विश्रांती घेईन.
हेही वाचा-
विराट कोहलीने लिहिला नवा इतिहास, आयसीसी स्पर्धेत ‘न भूतो न भविष्यति’ कामगिरी!
‘आम्ही चूकलो, भारताने चांगली….’, पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार रिजवानचे स्पष्ट वक्तव्य
विराट कोहलीचे पाकिस्तानविरुद्ध शतक! 5 मोठ्या रेकाॅर्डवर कोरले नाव
Comments are closed.