बुम-बुमचा दबदबा; आयसीसीनंतर बीसीसीआयने देखील केला विशेष सन्मान….

मागील वर्षात (2024) टीम इंडीयाचा स्टार गोलंदाज असणाऱ्या जसप्रीत बुमराहचा दबदबा पाहायला मिळाला.  ज्यात त्याने कसोटी आणि टी20 मध्ये चमकदार कामगिरी केली. बुमराहच्या शानदार गोलंदाजीमुळेच टीम इंडियाने 2024 चा टी20 विश्वचषक जिंकला. यानंतर बुमराहने कसोटीतही आपली कमाल दाखवली. वर्षभर कसोटी सामन्यांमध्ये शानदार गोलंदाजी केल्यानंतर, त्याने वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही आपली जादू दाखवली. ज्यात बुमराह सर्वाधिक विकेट्स घेत मालिकावीर ठरला. त्याने 5 सामन्यात एकूण 32 विकेट्स घेतल्या. 2024 मध्ये बुमराह सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. या कामगिरीसाठी, आयसीसीने बुमराहला वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू तसेच वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्काराने सन्मानित केले. आयसीसी पुरस्कारांमध्ये कमाल केल्यानंतर बुमराहने आता बीसीसीआय पुरस्कारांमध्येही आपली छाप सोडली आहे.

वास्तविक, बीसीसीआयने बुमराहला ‘पॉली उम्रीगर’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. बुमराहला 2023-24 च्या पुरुष श्रेणीतील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूम्हणून हा पुरस्कार देण्यात आला आहे. गेल्या वर्षी त्याने भारतासाठी शानदार गोलंदाजी केली. बुमराहने आपल्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजीने टीम इंडियाला अनेक सामने जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. इंग्लंड आणि बांगलादेशविरुद्धच्या घरच्या मालिका जिंकण्यासाठी त्याने मोलाचे योगदान दिले. यानंतर, त्याने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपले गोलंदाजीचे कौशल्य सिद्ध केले. यामुळेच बुमराह आयसीसी आणि बीसीसीआय दोन्ही पुरस्कार जिंकला आहे.आयसीसी पुरस्कारांमध्ये चमकल्यानंतर बुमराहने बीसीसीआय पुरस्कारांमध्येही खळबळ उडवून दिली आहे.

महिला क्रिकेटबद्दल बोलायचे झाल्यास स्मृती मानधनाला वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले. मागील वर्ष मानधानासाठी खूप चांगले राहीले. तसेच डिसेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला बीसीसीआयचा विशेष पुरस्कार देण्यात आला. तर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फेब्रुवारी 2024 मध्ये राजकोट कसोटीत इंग्लंडविरुद्धच्या धमाकेदार अर्धशतकासाठी सरफराज खानला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पदार्पणाचा पुरस्कार देण्यात आला.

हेही वाचा :

टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूने घेतली निवृत्ती, चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी संघाला मोठा धक्का!
“विराट कोहलीला रणजी सामना खेळण्याची…” माजी क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य
रणजी सामन्यात कोहलीचा बोल्ड काढणाऱ्या सांगवानची मोठी प्रतिक्रिया! म्हणाला…

Comments are closed.