3 दिवसही टिकली नाही टीम इंडिया! पिंक बॉल टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा 10 विकेट्सनी विजय, मालिकाही ह
IND W विरुद्ध AUS W गुलाबी-बॉल कसोटी : पर्थ येथील वेस्टर्न ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशन ग्राउंड (WACA) येथे खेळल्या गेलेल्या डे-नाईट टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने भारतावर एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात भारतीय महिला संघ पूर्णपणे अपयशी ठरला आणि त्यामुळे मालिकाही गमवावी लागली. भारताचा डाव तीन दिवसही टिकू शकला नाही. तिसऱ्या दिवशीच्या पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलियाने 10 विकेट्सने सामना जिंकत मालिकेवर शिक्कामोर्तब केले.
पिंक बॉल कसोटी ऑस्ट्रेलियाने 10 गडी राखून जिंकली.
त्यासह, बहु-स्वरूप मालिका समाप्त होते.
स्कोअरकार्ड ▶️ https://t.co/60dR7l123m#TeamIndia | #AUSWIN pic.twitter.com/AtBWo9mvG7
— BCCI महिला (@BCCIWomen) 8 मार्च 2026
भारतीय फलंदाजीची निराशाजनक कामगिरी…
या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच सत्रापासून सामन्यावर पकड मिळवली. भारतीय संघ पहिल्या डावात 62.4 षटकांत 198 धावांवर गारद झाला. जेमिमा रॉड्रिग्ज हिने अर्धशतक झळकावले, मात्र इतर फलंदाज फार काळ टिकू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाकडून अॅनाबेल सदरलँड हिने सर्वाधिक 4 विकेट्स घेत भारतीय फलंदाजीला मोठा धक्का दिला.
यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 323 धावा करत 125 धावांची भक्कम आघाडी मिळवली. अॅनाबेल सदरलँड हिने गोलंदाजीनंतर फलंदाजीतही कमाल करत 129 धावांची शानदार शतकी खेळी केली. एलिस पेरी हिने 76 धावा करत महिला कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारी फलंदाज बनण्याचा मान मिळवला. भारताकडून पदार्पण करणाऱ्या सयाली सतघरे हिने 4 विकेट्स घेतल्या, मात्र ऑस्ट्रेलियाला मोठा स्कोअर करण्यापासून रोखता आले नाही.
दुसऱ्या डावातही अपयश
भारतीय संघाची दुसऱ्या डावातही स्थिती फारशी सुधारली नाही. स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा पुन्हा एकदा लवकर बाद झाल्या. सदरलँड आणि पदार्पण करणाऱ्या लुसी हॅमिल्टन यांनी मिळून भारतीय टॉप ऑर्डरला धक्का दिला. परिणामी भारताचा दुसरा डाव केवळ 149 धावांत आटोपला.
प्रतिका रावल हिने 63 धावांची झुंजार खेळी करत संघाला काहीशी झुंज दिली आणि ऑस्ट्रेलियासमोर 25 धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य अवघ्या 4.3 षटकांत एकही विकेट न गमावता सहज गाठले.
ऑस्ट्रेलियाने 5-2 ने जिंकली मालिका
ही मल्टी-फॉर्मॅट मालिका होती, ज्यात 3 टी-20, 3 वनडे आणि 1 कसोटी सामना खेळवण्यात आला. भारताने सुरुवातीला टी-20 मालिका 2-1 ने जिंकत आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन केले. त्यांनी वनडे मालिका 3-0 ने जिंकली आणि आता कसोटी सामनाही जिंकत संपूर्ण मालिका 5-2 ने आपल्या नावावर केली.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.