जसप्रीत बुमराहसाठी टीम इंडियाचा 'मास्टरप्लॅन'! फेब्रुवारी 2027 पर्यंत खेळणार केवळ….

भारतीय गोलंदाजीचा महत्त्वाचा भाग जसप्रीत बुमराह. त्याच्या कामगिरीमुळे अनेकांना त्याने आपल्या संघाकडून खेळावे, असे वाटते. तो संघात असला की थोडाफार दबाव कमी झालेला वाटतो, अशात भारतीय संघ व्यवस्थापनाने मात्र त्याच्यासाठी एक वेगळीच योजना आखली आहे. त्यांनी बुमराहला केवळ एकाच प्रकारवर लक्ष केंद्रित करण्यात सांगितले आहे.

भारतीय संघ व्यवस्थापनाच्या नव्या योजनेमुळे बुमराह आता केवळ एकाच प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळताना दिसेल. त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून विश्रांती दिली जाणार आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, संघ व्यवस्थापनाची अशी इच्छा आहे की बुमराहने केवल रेड बॉल क्रिकेटवर लक्ष केंद्रित करावे. त्यामुळे त्याचा न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी इंडिय ए संघाच्या एका सामन्यात समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

भारत वेस्टइंडिजविरुद्धची मालिका संपल्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. यामध्ये ५-५ सामन्यांची टी२० आणि एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. त्यानंतर दोन कसोटी सामन्यांची मालिका होईल. या दौऱ्यात तीन सराव सामने खेळले जाणार आहे. त्यासाठी इंडिया ए च्या तिसऱ्या सराव सामन्यात बुमराहचा समावेश केला जाणार आहे.

इंडिया ए संघाचा सामना ७ नोव्हेंबरला सुरू होईल, तर पहिला कसोटी सामना १९ नोव्हेंबरपासून वेलिंग्टनमध्ये खेळला जाणार आहे. यामुळे पहिल्या कसोटी आणि तिसऱ्या सराव सामन्यात बऱ्याच दिवसांचे अंतर आहे. त्यामुळे बुमराहला या सामन्यात खेळवले जाण्याची शक्यता आहे. तसेच न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी त्याला नियमित तपासणीसाठी बंगळुरूमधील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलेन्सला भेट द्यावी लागणार आहे.

तसेच नव्या योजनेमुळे बुमराह डिसेंबरमधील श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या आणि जानेवारी महिन्यातील झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकांमधून बाहेर पडू शकतो, कारण २१ जानेवारी २०२७ पासून बीजीटी सुरू होणार आहे. यामधीव शेवटचा सामना २७ फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे.

भारताने ऑस्ट्रेलियामध्ये याआधी झालेली बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ३-१ ने गमावली. त्यामुळे भारतीय संघाने किमान मायदेशात ही स्पर्धा जिंकली पाहिजे, असे संघ व्यवस्थापनाला वाटते. त्यामुळेच बुमराहाला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून वगळले जाण्याची शक्यता आहे.

बुमराह आता पूर्णपणे फिट आहे, मात्र मोठ्या दौऱ्यासाठी प्राधान्यक्रम ठरवणे आवश्यक आहे. कसोटी मालिका महत्त्वाची आहे. त्यामुळे बुमराहला एकदिवसीय क्रिकेटमध्ये अधिक खेळायला सांगणे आणि नंतर अचानक रेड बॉल क्रिकेट खेळण्यास सांगण्यात काही अर्थ नाही. तो भारतीय गोलंदाजी फळीतील महत्त्वाचा खेळाडू आहे, असे एका सूत्राने सांगितले.

बुमराहला गुडघ्याच्या दुखापतीमुळे या वर्षाच्या सुरूवातीला श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांना मुकावे लागले होते. आता तो आगामी कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध आणि फिट असावा असे संघ व्यवस्थापनाचे मत आहे. (Team India Management different plan for Jasprit Bumrah before New Zealand Tour)

Comments are closed.