शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरचं कमबॅक कधी होणार? गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल म्हणाले…
रांची: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिका 30 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. पहिली वनडे मॅच रांची येथे होणार आहे. मात्र, कॅप्टन शुभमन गिल आणि उपकॅप्टन श्रेयस अय्यर यांची उणीव टीम इंडियाला भासत आहे. हे दोघे दुखापतग्रस्त असल्यानं त्यांना दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या वनडे मालिकेत स्थान देण्यात आलं नाही. भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी दोघांच्या दुखापतीसंदर्भात अपडेट दिली आहे. गिल दुखापतग्रस्त असल्यानं वनडे मालिकेत केएल राहुल भारताचा कॅप्टन आहे.
श्रेयस आणि गिलबाबत मॉर्केल काय म्हणाले?
पहिल्या वनडे पूर्वी मोर्ने मॉर्केल म्हणाले की माझी दोन दिवसांपूर्वी शुभमन गिल सोबत चर्चा झाली होती. तो लवकर बरा होत आहे, ही चांगली बातमी आहे. श्रेयस अय्यर बाबत ते म्हणाले की त्यानं रिहॅब सुरु केलं आहे. दोघेही लवकरच संघात पुनरागमन करतील अशी आशा आहे. दोघेही बरे असून टीममध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत व्यस्त आहेत, असं मोर्ने मॉर्केल म्हणाले.
शुभमन गिल दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या वनडे मालिकेला मुकला तरी टी 20 मालिका खेळू शकतो अशी आशा कायम आहे. टी 20 मालिका 9 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. श्रेयस अय्यर सध्या केवळ वनडे मध्ये संघात असल्यानं तो कधी पुनरागमन करेल याबाबत अनिश्चितता आहे.
शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकाता कसोटीत दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात फलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाला होता. भारताच्या पहिल्या डावात सायमन हार्मर विरुद्ध स्वीप शॉट मारताना गिलच्या मानेत वेदना होऊ लागल्या होत्या. त्यामुळं गिल दुसऱ्या कसोटीला मुकला होता.
श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलियात वनडे मालिकेत कॅच पकडताना जखमी झाला होता. त्याला पोटाच्या वरच्या भागात दुखापत झाली होती. अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यानं त्याच्यावर सिडनीत सर्जरी करावी लागली होती.
Team India for ODI Series : भारताचा संघ जाहीर
रोहित शर्मा, यशस्वी जयस्वालविराट कोहलीटिळक वर्मा, के.एल एक पुरुष नाव (कॅप्टन, यष्टिरक्षक), ऋषभ पंत (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजाकुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डीहर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंगध्रुव जुरेल,
एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
३० नोव्हेंबर : पहिली एकदिवसीयरांची
3 डिसेंबर : दुसरी एकदिवसीय, रायपूर
6 डिसेंबर : तिसरी एकदिवसीय, विशाखापट्टणम
आणखी वाचा
Comments are closed.