ईशान किशनची कमाल! ठरला या बाबतीत भारताचा नंबर-1 खेळाडू, कर्णधार म्हणून असा पराक्रम करणारा पहिला फलंदाज
भारतीय संघाबाहेर असलेल्या विकेटकीपर फलंदाज ईशान किशनने यंदाच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये फलंदाजीने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. झारखंड संघाचा कर्णधार म्हणून, ईशान किशनने यावेळी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये दुहेरी जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि त्याने दोन्हीमध्ये स्वतःला पारंगत सिद्ध केले. किशनच्या नेतृत्वाखाली झारखंडने पहिल्यांदाच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली. त्याने एकूण 517 धावा केल्या आणि नवीन विक्रम प्रस्थापित केले.
भारताच्या अनेक खेळाडूंनी टी20 क्रिकेटमध्ये असाधारण कामगिरी केली आहे, ज्यामध्ये अनेक शतके समाविष्ट आहेत. ईशान किशन आता टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा भारतीय विकेटकीपर-फलंदाज बनला आहे. या कामगिरीत त्याने संजू सॅमसनला मागे टाकले. हरियाणाविरुद्धच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात ईशान किशनने शतक ठोकले आणि विकेटकीपर-फलंदाज म्हणून त्याचे टी20 क्रिकेटमधील पाचवे शतक ठरले. संजू सॅमसनने टी-२० क्रिकेटमध्ये विकेटकीपर-फलंदाज म्हणून चार शतके झळकावली आहेत.
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारे यष्टीरक्षक-फलंदाज
क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका) – 7 शतके
ईशान किशन (भारत) – 5 शतके
कामरान अकमल (पाकिस्तान) – ५ शतके
संजू सॅमसन (भारत) – 4 शतके
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025मधील ईशान किशनच्या कामगिरीबद्दल, त्याने 10 सामन्यांमध्ये 57.44 च्या सरासरीने 517 धावा केल्या आहेत. ईशान किशनने स्पर्धेत सर्वाधिक 33 षटकार मारले. ईशान किशन सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या इतिहासात अंतिम सामन्यात शतक झळकावणारा पहिला कर्णधार बनला. तसेच, अनमोलप्रीत सिंगनंतर SMAT च्या अंतिम फेरीत शतक करणारा तो दुसराच फलंदाज आहे.
Comments are closed.