आता ‘ते’ प्रयोग बंद करा नाहीतर…, गौतम गंभीर-सूर्यकुमार यादवच्या स्ट्रॅटेजीवर माजी खेळाडू संता


Aakash Chopra on Team India Experiments : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका 2-1 ने जिंकली. दोन सामने पावसामुळे रद्द झाले. या मालिकेत भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात अनेक कॉम्बिनेशन्स आजमावले. मात्र, माजी भारतीय फलंदाज आणि समालोचक आकाश चोप्रा यांच्या मते, आता टीम मॅनेजमेंटने प्रयोगांचा सिलसिला थांबवण्याची वेळ आली आहे. त्याने यासाठी ठोस कारणही दिली आहे.

टीम इंडियाच्या कॉम्बिनेशनवर काय म्हणाला आकाश चोप्रा?

आकाश चोप्रा त्याच्या यूट्यूब चॅनेलवर म्हणाला की, “आत्ता जो काळ चालू आहे तो पूर्णपणे एक्सपेरिमेंटचा काळ आहे. पण मला वाटतं की आता हे एक्सपेरिमेंट थांबायला हवेत. आतापर्यंत असं सांगितलं गेलं की फलंदाजी क्रमात कोणालाही वर-खाली पाठवता येईल, कोणालाही संधी देता येईल किंवा वगळता येईल. टीमने हे मान्य केलं होतं की ते अजून एक्सपेरिमेंटल फेज मध्ये आहेत. आता ऑस्ट्रेलियातली मालिका संपली आणि पुढे घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्ध प्रत्येकी पाच-पाच टी-20 सामने बाकी आहेत.

पुढे तो म्हणाला की, मला वाटतं की आता एक्सपेरिमेंटचा काळ संपला आहे. आवश्यक गोष्टींची टेस्ट झाली आहे, त्यामुळे वर्ल्ड कपपूर्वी आणखी काही बदल करणं योग्य ठरणार नाही. वर्ल्ड कप फेब्रुवारीतच सुरू होणार आहे.” पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात टी-20 वर्ल्ड कप भारत आणि श्रीलंका येथे होणार आहे. भारताने 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवून टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता.

आकाश चोप्रा म्हणाला की, “घरच्या मैदानावर स्पर्धा खेळताना दडपण खूप असतं. आपण सध्याचे गतविजेते आहोत. 2024 वर्ल्ड कपनंतर आपण जिथे गेलो तिथे विजय मिळवला आहे. पण याचा अर्थ असा नाही की आपण आत्म-समाधानी व्हावं. घरच्या मैदानावर वर्ल्ड कप जिंकणं अत्यंत कठीण असतं. जरी आपल्याला ओळखीच्या परिस्थितीचा फायदा मिळत असला, तरी त्याचबरोबर दडपणही वाढतं. त्यामुळे आता प्रयोगांचा खेळ थांबवून, वर्ल्ड कपसाठी सर्वाधिक योग्य असलेली प्लेइंग इलेव्हन निश्चित करण्याची वेळ आली आहे.” (No more experiments Aakash Chopra advice to Gautam Gambhir Suryakumar Yadav)

हे ही वाचा –

Team India Hong Kong Sixes 2025 : शेवटही पराभवानेच, टीम इंडियाची पुन्हा नामुष्की! पाकिस्तान सोडून सगळ्यांकडून हरले; लिंबूटिंबू संघांनी दाखवली दिनेश कार्तिकला जागा

आणखी वाचा

Comments are closed.