ODI World Cup 2027: 2 जागांसाठी ‘या’ 3 खेळाडूंमध्ये जुंपली; विश्वविजेता खेळाडू शर्यतीत पिछाडीवर!

बीसीसीआय आगामी आयपीएल 2026 दरम्यान 2027 च्या विश्वचषकासाठी 20 स्टार खेळाडूंवर बारकाईने लक्ष ठेवणार आहे. यातील 15 खेळाडूंना पुढील एक वर्ष सातत्याने संधी दिली जाईल. त्यामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान मिळवण्यासाठी या खेळाडूंना आयपीएल 2026 मध्ये दमदार कामगिरी करावी लागेल. सध्या संघातील 2 जागांसाठी 3 खेळाडूंमध्ये मोठी चुरस सुरू आहे.
2027 चा विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत होणार असल्याने तिथल्या खेळपट्ट्यांवर फिरकीपटूंपेक्षा वेगवान गोलंदाजी करणाऱ्या ऑलराउंडरची (Fast Bowling All-rounder) गरज जास्त भासणार आहे. त्यामुळे भारतीय संघ 2 अशा खेळाडूंच्या शोधात आहे. सध्या या 2 जागांसाठी हार्दिक पांड्या, शिवम दुबे आणि नितीश कुमार रेड्डी यांच्यात शर्यत सुरू आहे.
हार्दिकची जागा संघात जवळपास पक्की मानली जाते. मात्र, त्याची वारंवार होणारी दुखापत ही चिंतेची बाब आहे. जर हार्दिक पूर्णपणे फिट राहिला, तर त्याचे स्थान निश्चित असेल. तसेच, सध्या नितीश या शर्यतीत आघाडीवर आहे, पण त्याच्या खराब फॉर्ममुळे निवड समितीची चिंता वाढली आहे. जर आयपीएल 2026 मध्ये तो अपयशी ठरला, तर त्याचे संघातील स्थान धोक्यात येऊ शकते.
टी-20 विश्वचषक 2026 (Icc T20 international world cup 2026) मधील चांगल्या कामगिरीमुळे शिवम दुबे (Shivam Dube) पुन्हा शर्यतीत आला आहे. त्याने फलंदाजीत स्वतःला सिद्ध केले आहे, पण गोलंदाजीमध्ये त्याला अजून छाप पाडायची आहे.
जर आयपीएल 2026 मध्ये शिवम दुबेने फलंदाजीसोबतच गोलंदाजीनेही प्रभावित केले, तर नितीश कुमार रेड्डीच्या (Nitish Kumar Reddy) जागी त्याला 2027 च्या विश्वचषकात खेळण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे या तिन्ही खेळाडूंसाठी आगामी आयपीएलचा हंगाम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
Comments are closed.