तीन स्टार खेळाडूं OUT, टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये धक्कादायक बदल निश्चित, माजी भारतीय सलामी

IND vs PAK 11 T20 विश्वचषक 2026 खेळत आहे : टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची क्रिकेट चाहत्यांना लागलेली उत्सुकता अखेर शिगेला पोहोचली आहे. आज 15 फेब्रुवारी रोजी, भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. या छोट्या फॉरमॅटमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताचा विक्रम दमदार राहिला आहे. मागील सामना जिंकून टीम इंडिया आत्मविश्वासात असली तरी या लढतीत संघात तीन महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

माजी भारतीय सलामीवीर आणि समालोचक आकाश चोप्रा याने सोशल मीडियावर भारताच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनबाबत आपले मत मांडले आहे. त्याच्या मते, कोलंबोची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना पोषक ठरण्याची शक्यता आहे. अलीकडील काही सामन्यांतही स्पिनर्सना चांगली मदत मिळाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला विश्रांती देत कुलदीप यादवला अंतिम अकरात संधी मिळू शकते.

तसेच, कर्णधार सूर्यकुमार यादव याने अभिषेक शर्माच्या पुनरागमनाचे संकेत दिल्यामुळे संजू सॅमसनला बाहेर बसावे लागू शकते. तिसरा बदल म्हणून वॉशिंग्टन सुंदरला संधी देत रिंकू सिंगला विश्रांती दिली जाऊ शकते, असे चोप्राचे मत आहे. सुंदर फिरकी गोलंदाजीसोबत संयमी फलंदाजीचाही पर्याय देतो, जे कोलंबोच्या खेळपट्टीवर संघासाठी फायदेशीर ठरू शकते.

भारताची संभाव्य प्लेइंग-11 : अभिषेक शर्मा, ईशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.

टी-20 विश्वचषक 2026 साठी भारतीय संघ (Indian squad for T20 World Cup 2026) : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.

कोलंबोतील हवामान कसं आहे?

कोलंबोमध्ये सध्या पाऊस पडत नाही. आकाशात ढग आहेत, मात्र तात्काळ पावसाची शक्यता कमी दिसते. तरीही हवामान खात्याच्या अंदाजानुसार टी-20 वर्ल्ड कपच्या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामन्यावेळी हवामान कसं वळण घेतं, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा –

India Vs Pakistan: टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे हे 6 धुरंदर आज पहिल्यांदाच पाकिस्तानविरोधात हायव्होल्टेज थरार प्रत्यक्ष मैदानात अनुभवणार!

आणखी वाचा

Comments are closed.