सुपर-6चं गणित उलगडलं; टीम इंडियाने 15 संघांना धूळ चारत सर्वात आधी मारली एन्ट्री, पाहा समीकरण

भारत U19 सुपर-6 साठी पात्र: अंडर-19 वनडे वर्ल्ड कप 2026 मध्ये टीम इंडियाने सुपर सिक्ससाठी पात्रता मिळवली असून, ही कामगिरी करणारी भारत ही संपूर्ण स्पर्धेतील पहिलीच टीम ठरली आहे. बांगलादेशवर मात करत भारताने सलग दुसरा विजय नोंदवत पुढील फेरीतील आपली जागा निश्चित केली.

भारताचा समावेश ग्रुप ‘बी’ मध्ये असून, या गटात बांगलादेश, न्यूझीलंड आणि USA या संघांचाही समावेश आहे. या गटातून तीन संघांना सुपर सिक्समध्ये प्रवेश मिळणार आहे. भारताने पहिल्या दोन सामन्यांत विजय मिळवत 4 गुणांची कमाई केली असून, त्यामुळे सुपर सिक्सचे तिकीट पक्के झाले आहे.

सुपर सिक्समध्ये पोहोचणारा भारत पहिलाच संघ

अंडर-19 वनडे वर्ल्ड कप 2026 मध्ये एकूण 16 संघ सहभागी असून, त्यांना 4 गटांत विभागण्यात आले आहे. प्रत्येक गटात 4 संघ आहेत. भारताने आपल्या गटातून सुपर सिक्ससाठी पात्रता मिळवली असून, फक्त आपल्या गटातूनच नव्हे तर संपूर्ण स्पर्धेतून सुपर सिक्समध्ये पोहोचणारा भारत पहिला संघ ठरला आहे. याचा अर्थ असा की उर्वरित 15 संघांपेक्षा आधी भारताने पुढील फेरीत स्थान निश्चित केले आहे.

भारताने सुपर सिक्सची जागा कशी पक्की केली? (How did India secure place in the Super Six?)

ग्रुप स्टेजमधील पहिले दोन सामने जिंकत भारताने सलग विजयांची नोंद केली. इतर संघांनी अद्याप एकही सामना खेळलेला नाही, किंवा एकच सामना खेळला आहे, किंवा दोन सामने खेळूनही दोन्ही जिंकलेले नाहीत. त्यामुळे भारताचे 4 गुणांसह सुपर सिक्समध्ये स्थान निश्चित झाले आहे. आता उर्वरित सामने जिंकण्यात यश मिळाल्यास, भारत ग्रुप स्टेजमध्ये अव्वल स्थानावर राहून सुपर सिक्समध्ये प्रवेश करू शकतो.

सुपर सिक्सचा नेमका फॉरमॅट काय आहे? (U19 World Cup 2026 Super Six format)

ग्रुप स्टेजनंतर प्रत्येक गटातून 3-3 संघ सुपर सिक्ससाठी पात्र ठरतील. त्यानंतर या संघांना 6-6 संघांच्या दोन गटांत विभागले जाईल. सुपर सिक्समध्ये प्रत्येक संघ आपापल्या गटातील इतर संघांविरुद्ध सामने खेळेल. प्रत्येक सुपर सिक्स गटातील अव्वल दोन संघांना सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळेल, आणि तिथून पुढे अंतिम सामन्याची शर्यत रंगेल.

हे ही वाचा –

संघात असूनही बाहेरच, टी20 वर्ल्डकपमध्ये ‘या’ 4 खेळाडूंचा रोल फक्त बेंचपुरताच?, अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग 11

आणखी वाचा

Comments are closed.