हर्षित की वरूण? ऑस्ट्रेलिया विरुद्ध प्लेइंग इलेव्हन मध्ये कोणाचा होणार प्रवेश? जाणून घ्या एका क्लिकवर
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरी सामन्यात भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलिया संघाच आव्हान असेल. मंगळवार 4 मार्च रोजी दुबईच्या स्टेडियमवर दोन्ही संघ समोरासमोर असतील. याआधी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अ गटातील तिन्ही सामने जिंकून लय राखली आहे. भारतीय संघाने बांगलादेश शिवाय पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा पराभव केला आहे. तसेच न्यूझीलंड विरुद्ध भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये हर्षित राणाच्या जागी फिरकीपटू वरूण चक्रवर्तीला संघात स्थान देण्यात आले होते. त्याआधी बांगलादेश आणि पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात हर्षित राणा खेळत होता. आता हा प्रश्न उपस्थित होत आहे की ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध उपांत्य फेरी सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये हर्षित राणाचे पुनरागमन होणार का? की वरूणच पुढच्या सामन्यात खेळताना दिसेल? यामध्ये शंका आहे. पण काही माजी खेळाडूंचं म्हणणं आहे की, भारतीय संघाला त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये हर्षित राणा आणि वरूण चक्रवर्ती दोघांनाही स्थान द्यायला हवे. तसेच मोहम्मद शमीला विश्रांती दिली जाऊ शकते. आता हे पाहणं उत्सुकतेच असणार आहे की, भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापन काय निर्णय घेतील. त्याचबरोबर भारतीय संघाच्या फलंदाजी मध्ये कोणताही जास्त बदल होण्याची शक्यता फार कमी आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामन्यात रोहित शर्मा आणि शुबमन गिल ओपनिंग करताना दिसतील. त्यानंतर विराट कोहली श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजा खेळताना दिसतील. या प्रकारे भारतीय संघात अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्या तसेच रवींद्र जडेजा हे अष्टपैलू खेळाडू असतील. त्यासोबत कुलदीप यादव आणि वरूण चक्रवर्ती फिरकीपटू म्हणून खेळतील. जर भारतीय संघाचे असे स्वरूप असेल तर मोहम्मद शमी आणि हार्दिक पांड्या वेगवान गोलंदाजाची भूमिका करताना दिसतील.
भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:-
रोहित शर्मा (कर्णधार ),शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल,(यष्टीरक्षक) हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव वरूण चक्रवर्ती आणि मोहम्मद शमी.
हेही वाचा
रोहित शर्माने गाठला नवा शिखर; विराट-धोनीसह कपिल देवलाही टाकलं मागे!
IND vs AUS: उद्या रंगणार सेमीफायनलचा थरार! कधी आणि कुठे पाहायचा लाईव्ह सामना?
ऑस्ट्रेलियाविरुद्ध के. एल. राहुलला विश्रांती? ऋषभ पंतला संधी मिळण्याची चर्चा जोरात
Comments are closed.