आयसीसीच्या क्रमवारीत टीम इंडियाच अव्वल; टी-20 अन् एकदिवसीय क्रमवारीत राखला दबदबा

आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा दबदबा बघायला मिळाला. टीम इंडियाने टी-20 आणि एकदिवसीय क्रमवारीत अक्वल स्थान कायम राखले. मात्र, कसोटी क्रमवारीत हिंदुस्थानी संघ तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरला. कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाने अक्वल स्थान मिळविले.
हिंदुस्थानी संघाने आयसीसी ट्रॉफीतील यशस्वी कामगिरीच्या जोरावर एकदिवसीय आपली रेटिंग 122 वरून 124 पर्यंत वाढविली आहे. या क्रमवारीत न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला पिछाडीवर टाकत दुसरे स्थान मिळविले. याचबरोबर श्रीलंका, पाकिस्तान व दक्षिण आफ्रिका अनुक्रमे चौथ्या, पाचव्या व सहाव्या स्थानावर आहेत. अफगाणिस्तान संघाने चार क्रमांकाने सुधारणा सातव्या स्थानावर झेप घेतली आहे. दुसरीकडे इंग्लंड संघ 4 गुण गमावल्याने आठव्या स्थानावर घसरलाय. वेस्ट इंडीजने बांगलादेशला पिछाडीवर टाकत नववा क्रमांक मिळविला आहे.
टी-20 क्रिकेटमधील जगज्जेत्या हिंदुस्थानी संघाने सर्वाधिक 271 रेटिंगची कमाई केली आहे. या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया 262 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे. टीम इंडियाने गतवर्षी वेस्ट इंडीज व अमेरिकेत झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवून जगज्जेतेपद पटकावले होते.
Comments are closed.