भारताने आशिया कप 2025 मध्ये बनवला सर्वाधिक स्कोर, श्रीलंकेसमोर 203 धावांचं लक्ष्य
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील आशिया कप 2025चा 18वा सामना शुक्रवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 5 गडी गमावून 202 धावा केल्या. ज्यामध्ये अभिषेक शर्माने 61 आणि तिलक वर्मानमे 49 धावा केल्या. ही चालू स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या आहे. श्रीलंकेसाठी तुषारा वगळता सर्वांनी विकेट घेतल्या.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. महेश थिक्षणाने शुभमन गिलला चार धावांवर बाद केले. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव 13 चेंडूत फक्त 12 धावा करू शकला. अभिषेक शर्माने 31 चेंडूत 61 धावा केल्या. अभिषेकला अस्लंकाने बाद केले. संजू सॅमसनने 23 चेंडूत 39 धावा केल्या. हार्दिक पांड्याही फ्लॅाप ठरला. त्याला तीन चेंडूत फक्त दोन धावा करता आल्या. अक्षर पटेलने 21 तर तिलक वर्मा नाबाद 49 धावा केल्या.
दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन:
भारत: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.
श्रीलंका: पथम निसांका, कुसल मेंडिस (यश्तार रक्ष), कुसल परेरा, चारिथ असांका (कर्नाधर), कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदु हसरंगा, जेनिथ लिंज, दश्मण्था चरेरा, माहेश, महेश
Comments are closed.