470 चौकार- षटकारांसह टीम इंडियाचा नवा वर्ल्ड रेकॉर्ड; ऑस्ट्रेलियालाही टाकलं मागे

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाच्या फलंदाजांची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. या मालिकेत भारताच्या फलंदाजांनी भरपूर धावा केल्या. या मालिकेत टीम इंडियाच्या फलंदाजांनी चौकार आणि षटकार मारण्याच्या बाबतीतही विश्वविक्रम केला. या पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय फलंदाजांनी 422 चौकार आणि 48 षटकार मारले. एकूण 470 चौकार मारले जो एक विश्वविक्रम आहे. यापूर्वी, ऑस्ट्रेलियन संघाने एका कसोटी मालिकेत 460 चौकार मारण्यात यश मिळवले होते.

ऑस्ट्रेलियन संघाने 1993च्या अ‍ॅशेस मालिकेत 451 चौकार आणि 9 षटकारांसह एकूण 460 चौकार मारण्यात यश मिळवले होते. पण आता टीम इंडियाने 470 चौकार मारून त्यांचा विक्रम मोडला आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी एकाच कसोटी मालिकेत 400 पेक्षा जास्त चौकार मारण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी 1964 मध्ये भारतीय फलंदाजांनी एकाच कसोटी मालिकेत 384 चौकार ठोकले होते.

इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी मालिकेत टीम इंडियाच्या 12 फलंदाजांनी शतके ठोकली, हा एक विक्रम आहे. याआधी ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांनी कसोटी क्रिकेटमध्ये असा पराक्रम केला आहे, या तिन्ही संघांच्या 12 फलंदाजांनी कसोटी मालिकेत शतके ठोकली. याआधी 1978-79 च्या कसोटी मालिकेत टीम इंडियाच्या 11 फलंदाजांनी शतके ठोकली.

ओव्हल कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, टीम इंडियाने या सामन्यात इंग्लंडसमोर 374 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारतासाठी यशस्वी जयस्वालने दुसऱ्या डावात शानदार शतकासह 118 धावा केल्या. शिवाय नाईट वॉचमन आकाश दीपने 66 धावा केल्या. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी 53-53 धावांचे योगदान दिले. तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने एका विकेटच्या मोबदल्यात 50 धावा केल्या आहेत. येथून सामना जिंकण्यासाठी त्यांना 324 धावांची आवश्यकता आहे.

Comments are closed.