उपकर्णधारपद तर विसरा, शुभमन गिल संघातूनच बाहेर? आशिया कपआधी खळबळ उडवून देणार अपडेट

एशिया चषक 2025 साठी टीम इंडिया पथक अद्यतनः आशिया कप टी-20 साठीचा भारतीय संघ मंगळवारी जाहीर होणार असून, अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती काही कठीण निर्णय घेण्याची शक्यता आहे. शुभमन गिल, ज्यांना अनेक अहवालांमध्ये टी-20 संघाचा उपकर्णधार होण्याचा प्रबळ दावेदार मानलं जात होतं, त्यांच्या आशिया कप 2025 मधील सहभागावरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, भारतीय निवड समिती सध्या संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांच्या सलामी जोडीवर खूश आहे. त्यामुळे गिलला संघात स्थान मिळणं कठीण ठरू शकतं.

उपकर्णधार तर दूरच, संघात स्थान मिळणंही कठीण

आशिया कप 2025 हा टी-20 स्वरूपात खेळवला जाणार आहे. काही दिवसांपूर्वी गिलला टी-20 संघाचा उपकर्णधार बनवण्याची चर्चा होती. मात्र, आता समोर आलेल्या माहितीनुसार, त्यांना संघात स्थान मिळण्याची शक्यता देखील कमी आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं, “भारत सध्या संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांच्या सलामी जोडीसह पुढे जाण्याच्या विचारात आहे. त्यामुळे गिलला संघात स्थान मिळणं कठीण आहे. अगदी यशस्वी जैस्वाल ज्यांनी इंग्लंड दौऱ्यात उत्कृष्ट खेळी केली, आणि मधल्या फळीतील श्रेयस अय्यर यांच्याही टी-20 संघात निवडीची शक्यता कमी आहे. निवडकर्त्यांनी जैस्वालला सध्या लाल चेंडू क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे.”

9 सप्टेंबरपासून आशिया कपला सुरुवात

आशिया कप 2025 ची सुरुवात 9 सप्टेंबरला होणार असून, भारत आपला पहिला सामना 10 सप्टेंबरला यूएईविरुद्ध खेळेल. त्यानंतर 14 सप्टेंबरला दुबईत भारत-पाकिस्तान यांच्यात महामुकाबला रंगणार आहे. ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना भारत 19 सप्टेंबरला ओमानविरुद्ध खेळेल.

भारत-पाकिस्तान तीन वेळा येऊ शकतात आमनेसामने….

आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान एकदा नाही, तर तीनदा भिडू शकतात. पहिली वेळ ग्रुप स्टेजमध्ये, दुसरी वेळ जर दोन्ही संघ सुपर-4 मध्ये पोहोचले तर, आणि तिसरी वेळ जर दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले तर खिताबासाठी सामना रंगेल.

हे ही वाचा –

Nicholas Saldanha Passed Away : क्रिकेटविश्वात शोककळा! महाराष्ट्रचे दिग्गज क्रिकेटपटू निकोलस साल्दान्हा काळाच्या पडद्याआड, वयाच्या 83व्या घेतला अखेरचा श्वास

आणखी वाचा

Comments are closed.