गिल अन् सिराज बेंचवर, वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूने निवडली आशिया कपसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11,

एशिया चषक 2025 साठी टीम इंडिया पथक: आशिया कप 2025ची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होणार आहे. भारतीय संघाची अधिकृत घोषणा 19 ऑगस्ट रोजी होणार असली तरी, त्याआधी माजी क्रिकेटपटू मोहम्मद कॅफने (Mohammad Kaif picks his India XI for the upcoming Asia Cup 2025) स्वतःचा 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, कॅफने शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज यांना स्क्वॉडमध्ये स्थान दिलं असलं, तरी त्यांना अंतिम अकरामधून बाहेर ठेवले आहे.

कॅफची प्लेइंग-11, गिल-सिराजला वगळले…

कैफने त्याच्या 15 सदस्यीय संघात गिल आणि सिराजला संधी दिली. पण इंग्लंडमध्ये भारतीय संघाचे हिरो असलेले गिल आणि सिराज यांना प्लेइंग-11 मधून बाहेर ठेवण्यात आले आहे. कॅफने संघात सलामीवीर म्हणून संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांची जोडी ठेवली आहे. तिसऱ्या क्रमांकावर तिलक वर्मा, तर चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव (कर्णधार) यांची निवड केली आहे. अष्टपैलू अक्षर पटेलला उपकर्णधाराची जबाबदारी देत पाचव्या क्रमांकावर स्थान दिलं आहे.

ऑलराउंडर म्हणून कैफने हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांना संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून निवडले आहे. त्याच वेळी, कैफने वॉशिंग्टन सुंदरला आठव्या क्रमांकावर ठेवले आहे. याशिवाय, कैफने मुख्य फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादवला संघात समाविष्ट केले आहे. त्याच वेळी, कैफने जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप यांच्याकडे जलद गोलंदाजीची कमान सोपवली आहे.

कॅफची संभाव्य प्लेइंग-11 : संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह.

15 जणांचा स्क्वॉड पूर्ण करण्यासाठी उरलेले चार खेळाडू म्हणजे – वरुण चक्रवर्ती, शुभमन गिल, मोहम्मद सिराज आणि जितेश शर्मा.

टीम इंडियाचं आशिया कप 2025चं वेळापत्रक

भारतीय संघ आपला मोहिमेचा पहिला सामना 10 सप्टेंबरला यूएईविरुद्ध खेळेल. त्यानंतर 14 सप्टेंबरला दुबईत भारत-पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज लढत रंगणार आहे. गट फेरीतील शेवटचा सामना 19 सप्टेंबरला भारत ओमानविरुद्ध खेळेल.

हे ही वाचा –

Sanju Samson : आशिया कपपूर्वी टीम इंडियाच्या सलामीवीर तळपला! फक्त इतक्या चेंडूंत ठोकले धमाकेदार अर्धशतक

आणखी वाचा

Comments are closed.