मोठी बातमी : इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; शुभमन गिलकडे कर्णधारपदाची धुरा; कोणा कोणाल

टीम इंडिया कसोटी पथक: आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयकडून (BCCI) भारतीय संघाची (Team India) घोषणा झाली आहे. या संघाचा कर्णधार म्हणून शुभमन गिलची  निवड करण्यात आली आहे. तर ऋषभ पंत  हा उपकर्णधार असेल. काही दिवसांपूर्वीच रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर या दोघांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाला खेळावे लागणार आहे. भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर याला कसोटी क्रिकेट संघात तरुण नेतृत्व आणि नव्या दमाचे खेळाडू हवे होते. त्यामुळे गौतम गंभीर हा रोहित शर्मा आणि विराट कोहलीला भारतीय संघात खेळवण्यासाठी उत्सुक नव्हता. विराट कोहलीला संघात स्थान मिळाले असते तरी त्याच्याकडे कर्णधारपद नसते. यामुळेच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. (Team India Test Squad)

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ

शुबमन गिल, कर्दधर

ऋषभ पंत- उपकर्णधार

यशस्वी जयस्वाल

करुन नायर

रवींद्र जडेजा

वॉशिंग्टन सुंदर

शार्दुल ठाकूर

जसप्रीत बुमराह

मोहम्मद सिराज

आकाश खोल

कुलदीप यादव

केएल राहुल

साई सुदर्शन

अभिमनु इश्वान

ध्रुव्ह जुरेल

प्रसिद्ध कृष्णा

अरशदीप गाणे

नितीष कुमार रेड्डी

यंदाच्या आयपीएल स्पर्धेत तडाखेबंद फलंदाजी करणारा आणि ऑरेंज कॅपचा मानकरी साई सुंदरला कसोटी संघात स्थान मिळेल, अशी  आशा होती. तो रोहित शर्माच्या जागी सलामीला येईल, अशी अटकळ बांधली जात होती. ही अटकळ खरी ठरली असून साई सुदर्शनचा भारतीय क्रिकेट संघात स्थान समावेश करण्यात आला आहे.

Team India: भारतीय कसोटी संघात किती फलंदाज?

बीसीसीआयने घोषणा केलेल्या कसोटी संघात शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर  या फलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे.

अष्टपैलू खेळाडूंमध्ये कोणाला संधी ?

नितीश रेड्डी, रवींद्र जाडेजा , वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर… शार्दूल बोलिंग ऑल राऊंडर म्हणून भारतीय संघात

Team India Test Team: भारतीय कसोटी संघात कोणते गोलंदाज?

भारतीय कसोटी संघात वेगवान गोलंदाजीची धुरा शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग हे गोलंदाज सांभाळतील. तर फिरकी गोलंदाज म्हणून रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव या दोन फुलटाईम फिरकी गोलंदाजांचा समावेश असेल.

भारतीय संघाचा इंग्लंड दौरा 20 जूनपासून सुरु होणार आहे. या दौऱ्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामने खेळले जाणार आहेत.

पहिली कसोटी: 20-24 जून 2025 – हेडिंग्ले, लीड्स

दुसरी कसोटी: 2-6 जुलै 2025 – एजबॅस्टन, बर्मिंगहॅम

तिसरी कसोटी: 10-14 जुलै 2025 – लॉर्ड्स, लंडन

चौथी कसोटी: 23-27 जुलै 2025 – ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर

पाचवी कसोटी: 31 जुलै-4 ऑगस्ट 2025 – द ओव्हल, लंडन

इतर महत्त्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

Comments are closed.