श्रेयस अय्यर कर्णधार, ऋतुराज, यशस्वी IN, शुभमन OUT…; न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी असा
न्यूझीलंड वनडे मालिकेसाठी भारतीय संघ : दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पाच सामन्यांची टी-20 मालिका संपल्यानंतर भारतीय संघाला 22 दिवसांचा ब्रेक मिळाला आहे, पण तरी खेळाडू मैदानापासून दूर राहणार नाहीत. वनडे संघाचा कर्णधार शुभमन गिल, माजी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह अनेक स्टार खेळाडू विजय हजारे ट्रॉफीत खेळताना दिसणार आहेत. दरम्यान, भारतीय संघ 2026 मधील आपला आंतरराष्ट्रीय वनडे मोहीम 11 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेने सुरू करणार आहे.
भारतीय संघाने अखेरची वनडे मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळली होती. त्या मालिकेत कर्णधार शुभमन गिल आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर अनुपस्थित असल्याने यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांना संधी मिळाली होती. केएल राहुलने त्या मालिकेत संघाचे नेतृत्व केले होते.
श्रेयस अय्यर कर्णधार, यशस्वी-ऋतुराज संघात कायम…
पण, न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी शुभमन गिलची संघात पुनरागमनाची शक्यता कमी आहे. त्यामुळे कर्णधारपदात बदल होण्याची शक्यता आहे. श्रेयस अय्यर निश्चित पुनरागमन करणार मानली जात आहे. त्यामुळे त्याच्याकडे कर्णधार जाऊ शकते. शुभमन गिल बाहेर गेला तर यशस्वी जैस्वालसोबतच ऋतुराज गायकवाडही संघात कायम राहतील. यशस्वी आधीपासूनच संघात रिझर्व्ह ओपनर म्हणून होता. दक्षिण आफ्रिका मालिकेत केवळ फलंदाज म्हणून निवड झालेल्या ध्रुव जुरेलला बाहेर बसावे लागणार आहे, कारण ऋषभ पंत दुसरा यष्टीरक्षक म्हणून संघात असेल.
सुंदर- अक्षर पैकी एकाला संधी
तिलक वर्मालाही संघात स्थान मिळणे जवळपास निश्चित आहे. टी-20 विश्वचषकाच्या तयारीचा विचार करता हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांची वनडे संघात निवड होणार नाही. अष्टपैलू खेळाडू म्हणून वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांच्यापैकी एकाला संधी दिली जाऊ शकते. रवींद्र जडेजा आणि नितीश कुमार रेड्डी यांची निवडही जवळपास ठरलेली आहे. वेगवान गोलंदाजी विभागात मोहम्मद सिराजची पुनरागमन होण्याची शक्यता असून प्रसिद्ध कृष्णा आणि आकाशदीप यांनाही संधी मिळू शकते. टी-20 विश्वचषक लक्षात घेता वर्कलोड मॅनेजमेंटसाठी अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांना विश्रांती दिली जाऊ शकते. फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादवची निवड अपेक्षित आहे.
रोहित-विराट पुन्हा मैदानावर दिसणार
या मालिकेचे खास आकर्षण म्हणजे रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे पुन्हा मैदानात दिसणार आहेत. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये हे दोन्ही दिग्गज पुन्हा खेळताना दिसणार असल्याने संघाला अनुभवाची मोठी ताकद मिळणार आहे. तसेच युवा खेळाडूंना अनुभवी खेळाडूंसोबत खेळण्याची संधीही मिळेल.
न्यूझीलंड वनडे मालिकेसाठी संभाव्य भारताचा वनडे संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीशकुमार रेड्डी, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर/अक्षर पटेल.
भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक (India vs New Zealand ODI Schedule)
पहिला एकदिवसीय सामना – 11 जानेवारी – वडोदरा – दुपारी 1:30 वाजता
दुसरा एकदिवसीय सामना – 14 जानेवारी – राजकोट – दुपारी 1:30 वाजता
तिसरा एकदिवसीय सामना – 18 जानेवारी – इंदूर – दुपारी 1:30 वाजता
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.