भुरट्या संघांकडून टीम इंडियाचे सलग तीन पराभव, नेपाळ, कुवेत आणि यूएईने एकाच दिवसात हरवलं
टीम इंडियाचा हाँगकाँगचा सलग तिसरा षटकार : हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत आज भारताला सलग तीन पराभवांचा सामना करावा लागला. गट टप्प्यातील पूल-सीमध्ये कुवेतकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाला बाउल राउंडमध्ये यूएई आणि नेपाळकडूनही पराभव पत्करावा लागला. कुवेतविरुद्धच्या पराभवानंतरच भारत क्वार्टर फायनल फेरीत प्रवेश करण्यात अपयशी ठरला होता. आता बाउल राउंडमधील पराभवांमुळे संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
यापूर्वी भारताने गट टप्प्यातील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा डकवर्थ-लुईस नियमांतर्गत दोन धावांनी पराभव करत शानदार सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर सलग पराभवांमुळे भारत पूल-सीमध्ये कुवेत आणि पाकिस्तानच्या मागे तिसऱ्या स्थानावर राहिला. बाउल राउंडमध्ये यूएई आणि नेपाळकडून झालेल्या पराभवानंतर भारतीय संघ सध्या चौथ्या स्थानी आहे. आता संघाचा पुढील सामना 9 नोव्हेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध होणार आहे.
लिंबूटिंबू कुवेत संघाने टीम इंडियाला हरवलं (Kuwait beat India Hong Kong Sixes 2025)
पूल-सीमधील सामन्यात कुवेतने भारतावर 27 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीही निराशाजनक ठरल्या. कुवेतने प्रथम फलंदाजी करत केवळ सहा षटकांत पाच गडी गमावून 106 धावा केल्या. प्रत्युत्तर भारताची संघ 5.4 षटकांत सहा गडी गमावून फक्त 79 धावांपर्यंतच मजल मारू शकली.
कुवेतनंतर यूएईसारख्या लहान संघानेही टीम इंडियाला हरवलं (UAE beat India Hong Kong Sixes 2025)
बाउल राउंडमधील पहिल्या सामन्यात भारताने यूएईविरुद्ध प्रथम फलंदाजी केली आणि सहा षटकांत तीन गडी गमावून 107 धावा केल्या. अभिमन्यु मिथुनने जबरदस्त खेळी करत 16 चेंडूत चार चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 50 धावा ठोकल्या. कर्णधार दिनेश कार्तिकनेही आक्रमक खेळ दाखवत 14 चेंडूत चार चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 42 धावा केल्या.
108 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूएई संघाने दमदार सुरुवात केली. कर्णधार खालिद शाहने फक्त 14 चेंडूत चार चौकार आणि पाच षटकारांसह 50 धावा केल्या. तर निलांश केसवानीने नाबाद पाच धावा करत यूएईला विजय मिळवून दिला. भारताकडून बिन्नी आणि चिपळी यांनी प्रत्येकी एक-एक बळी घेतला.
नेपाळसमोर 3 ओव्हर पण टिकू शकला नाही टीम इंडिया (Nepal beat India Hong Kong Sixes 2025)
बाउल राउंडमधील दुसऱ्या सामन्यात भारताला नेपाळकडून तब्बल 92 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना नेपाळने केवळ सहा षटकांत एकही गडी न गमावता 137 धावांचा डोंगर उभा केला. 138 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ केवळ तीन षटकांतच 45 धावांवर गारद झाला, म्हणजेच सर्व सहा गडी बाद झाले.
या स्पर्धेत एकूण 12 संघ सहभागी झाले असून, प्रत्येकी तीन संघांचे चार गट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या संघांना बाउल ग्रुपमध्ये ठेवण्यात आले, तर अव्वल दोन संघांनी क्वार्टर फायनल फेरीत प्रवेश केला. क्वार्टर फायनलनंतर स्पर्धा नॉकआउट टप्प्यात जाते, ज्यात मुख्य फायनल, प्लेट फायनल आणि बाउल फायनल अशा विविध स्तरांवर सामने खेळवले जातात, जेणेकरून सर्व संघांना स्पर्धात्मक संधी मिळेल.
स्पर्धेचा फॉर्मेट
प्रत्येक संघात 6 खेळाडू असतील आणि प्रत्येक संघाला 6 षटके फलंदाजीसाठी मिळतील. म्हणजेच एकूण सामना 12 षटकांचा असेल. 5 खेळाडू गोलंदाजी करू शकतात, परंतु यष्टिरक्षकाला गोलंदाजीची परवानगी नाही. त्यापैकी 4 खेळाडू प्रत्येकी 1 ओव्हर टाकतील आणि 1 खेळाडू 2 ओव्हर टाकेल (पण सलग नाही). जर एखादा फलंदाज 50 धावा पूर्ण करेल, तर त्याला ‘नॉट आऊट’ अवस्थेत रिटायर व्हावे लागेल. तो पुन्हा फक्त तेव्हाच फलंदाजीस येऊ शकतो, जेव्हा इतर फलंदाज बाद होतील.
हे ही वाचा –
ऋषभ पंतला पुन्हा दुखापत, वेदनेने विव्हळत मैदान सोडलं; नेमकं काय घडलं?, पाहा धडकी भरवणारा VIDEO
आणखी वाचा
Comments are closed.