IND vs SA: WTC पॉइंट्स टेबलमध्ये टीम इंडियाला नुकसान! दक्षिण आफ्रिकेची मोठी झेप
भारतात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत 30 धावांनी पराभव स्विकारावा लागला (Test series IND vs SA). या पराभवाचा थेट परिणाम वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपच्या पॉइंट्स टेबलवर झाला असून टीम इंडिया मागे सरकली आहे. अंकतालिकेत भारत आता चौथ्या स्थानावर गेला आहे, तर गतविजेती दक्षिण आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. कोलकाता कसोटीत मिळालेल्या या पराभवामुळे भारताच्या WTC फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशांनाही धक्का बसला आहे.
WTC पॉइंट्स टेबलमध्ये भारताने आतापर्यंत 8 पैकी 4 सामने जिंकले आहेत आणि त्यांचा पॉइंट्स टक्केवारी 54.17 आहे. सध्या ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या तिन्ही संघांनी भारताला मागे टाकले आहे. भारतानंतर पाकिस्तान पाचव्या स्थानावर असून त्यांची पॉइंट्स टक्केवारी 50 आहे.
WTC क्रमवारी:
ऑस्ट्रेलिया
दक्षिण आफ्रिका
श्रीलंका
भारत
पाकिस्तान
दक्षिण आफ्रिकेने अलीकडेच पाकिस्तानमध्ये झालेली कसोटी मालिका 1-1 अशी ड्रॉ ठेवली होती. आता कोलकाता कसोटी जिंकून त्यांनी भारताला ही मालिका जिंकण्यापासून रोखले आहे. टेंबा बावुमाच्या (Temba Bavuma) कर्णधारपदाखाली दक्षिण आफ्रिका सातत्याने उत्कृष्ट प्रदर्शन करत आहे. बावुमाच्या नेतृत्वाखाली आजवर 11 पैकी 10 सामने जिंकले गेले असून एक सामना ड्रॉ राहिला आहे.
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 159 धावा केल्या. त्याच्या प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव 189 धावांवर संपला. ही 30 धावांची आघाडी पहिल्या दृष्टीक्षेपात लहान वाटत असली तरी, कोलकात्याची खेळपट्टी जशी खेळत होती, तिथे 10 धावांची आघाडीही मोठा फरक करू शकत होती.
तिसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेने 153 धावा केल्या, त्यामुळे पहिल्या डावातील आघाडीनुसार भारतासमोर 124 धावांचे लक्ष्य ठेवले गेले. परंतु भारताची संपूर्ण टीम फक्त 93 धावांवर ऑलआउट झाली आणि भारताला सामना 30 धावांनी गमवावा लागला.
Comments are closed.