या दिवशी ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार टीम इंडिया, जाणून घ्या सविस्तर
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांची वनडे मालिका 19 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. मात्र, आतापर्यंत भारतीय संघ ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला नाही आहे. गिलच्या नेतृत्वाखाली संघ आता खेळण्यासाठी तयार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतीय संघ 15 ऑक्टोबर रोजी दिल्लीहून ऑस्ट्रेलियासाठी निघेल. संघाचे सर्व खेळाडू एकत्र ऑस्ट्रेलियासाठी रवाना होतील.
14 ऑक्टोबर रोजी विराट कोहली देखील लंडनहून दिल्ली मध्ये पोहोचला आहे. सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आले आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची कर्णधारपदाची जबाबदारी शुबमन गिलला दिली गेली आहे. गिल पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सामन्याची कर्णधारी म्हणून नेतृत्व करणार आहे. याशिवाय, रोहित शर्मा आणि विराट कोहली देखील गिलच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच खेळणार आहेत.
Comments are closed.