10 धावांत 4 विकेट! दुसऱ्या कसोटीतही भारताचे कागदी वाघ ढेपाळले, टॉप ऑर्डर पत्त्यासारखी कोसळली


भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, दुसरी कसोटी: दुसऱ्या कसोटी सामन्यात दोन दिवस फलंदाजीवर वर्चस्व गाजवल्यानंतर दक्षिण आफ्रिका आता गोलंदाजीत पण कहर करत आहेत. ज्यामुळे गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या कसोटी टीम इंडिया दडपणाखाली आली आहे. स्थिती अशी झाली आहे की सामना जणू दक्षिण आफ्रिकेच्या घरच्या मैदानावरच खेळला जात आहे, असा भास होत आहे.

दोन तासात चार, चार धक्के आहेत, भारताचा मोठा फॉल्स (संघ साधन कोसळले

तिसऱ्या दिवसाची सुरुवात भारताने एकही विकेट न गमावता 9 धावांवर केली. पण चहापानापर्यंत स्कोअर 4 बाद 102 एवढाच झाला आणि भारत अजूनही दक्षिण आफ्रिकेपेक्षा तब्बल 387 धावांनी पिछाडीवर आहे. कर्णधार ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा सध्या क्रीजवर नाबाद आहेत. फॉलोऑन टाळण्यासाठी भारताला अजून 290 धावा कराव्या लागणार आहेत.

10 धावांत 4 विकेट, भारतीय टॉप ऑर्डर पुन्हा अपयशी

टीम इंडियाचा स्कोअर एक वेळेस 1 बाद 95 होता. पण त्यानंतर फक्त 10 धावांत सलग 4 विकेट पडल्याने भारत अडचणीत सापडला. 105 धावांवर पाचवी विकेट गमावली, कर्णधार ऋषभ पंत 7 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

त्याआधी के. एल. राहुल 22 धावा करून बाद झाला, तर यशस्वी जैस्वालने अर्धशतक ठोकले, तो 58 धावांवर आऊट झाला. साई सुदर्शनने 15 धावा केल्या. ध्रुव जुरेल ज्यावर टीम इंडियाचा भरोसा जास्त होता, तो शून्यावर तंबूत परतला. दक्षिण आफ्रिकेकडून आतापर्यंत स्पिनर सायमन हार्मरने दोन विकेट घेतल्या, तर केशव महाराज आणि मार्को जानसेन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात केल्या 489 धावा

सामन्याच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना, खेळ थांबला तेव्हा सहा बाद 247 धावा केल्या. दुसऱ्या दिवशी, दक्षिण आफ्रिकेने 6 बादवर खेळ सुरू केला आणि सेनुरन मुथुस्वामी आणि काइल व्हेरेन यांच्या जोडीने भारतीय गोलंदाजांना रडवलं. काइल व्हेरेन अर्धशतक हुकले असले तरी, मुथुस्वामीने 109 धावा केल्या. त्यानंतर मार्को यान्सनने 93 धावा फटकावत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला या मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 151.1 षटके फलंदाजी केली आणि 489 धावा केल्या.

हे ही वाचा –

Smriti Mandhana Father Video : लेकीच्या चेहऱ्यावरुन मायेने हात फिरवला, आनंदाने नाचले; स्मृती मानधनाच्या वडिलांचा हार्टअटॅक येण्यापूर्वीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

आणखी वाचा

Comments are closed.