रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या चाहत्यांना धक्का, भारताचा बांगलादेश दौरा एक वर्ष लांबणीवर

नवी दिल्ली : भारताचा ऑगस्ट 2025 म्हणजेच पुढच्या महिन्यातील बांगलादेश दौरा एक वर्ष लांबणीवर टाकण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं 5 जुलै म्हणजे आजच ही घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक बोर्ड आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांनी सहमतीनं हा निर्णय घेतला आहे.

भारतीय क्रिकेट टीमचा ऑगस्ट 2025 बांगलादेशचा दौरा नियोजित होता. बांगलादेशमध्ये  भारतीय क्रिकेट संघ तीन वडे आणि तीन टी 20 सामना खेळणार होता. भारत आणि बांगलादेशमधील हे सामने 17 ते 31 ऑगस्टमध्ये होणार होती.

बीसीसीआयनं जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, दोन्ही क्रिकेट बोर्डांनी चर्चा करुन याबाबत निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांची  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील व्यस्तता आणि वेळापत्रक या संदर्भातील समस्यांमुळं मालिका लांबणीवर टाकण्यात आली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्ट केलं की सप्टेंबर 2026 मध्ये मालिकेच्या आयोजनास सज्ज असल्याचं म्हटलं.  या मालिकेसंदर्भातील तारखांची घोषणा नंतर केली जाणार असल्याचं म्हटलं आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्माच्या चाहत्यांना धक्का

बांगलादेश दौरा लांबणीवर गेल्यानं रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना क्रिकेट पाहणं लांबणीवर गेलं आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी कसोटी क्रिकेट आणि  टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळं वनडे क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळताना दिसतील.  आता रोहित शर्मा आणि विराट कोहली हे ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या वनडे मालिकेत खेळताना पाहायला मिळतील.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध तणावाचे बनले आहेत. याचा देखील या मालिकेच्या आयोजनावर परिणाम झाला असावा. भारत सरकारनं बीसीसीआयला भारतीय क्रिकेट टीम बांगलादेशला पाठवू नये असा सल्ला दिला होता. मात्र, बीसीसीआयनं दौरा लांबणीवर टाकण्यासंदर्भात वेगळी कारणं सांगितली आहेत.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.