श्रेयस, यशस्वी नव्हे भारत आशिया कपमध्ये ‘या’ खेळाडूला मिस करेल, हरभजननं नाव अन् कारण सांगितलं

नवी दिल्ली : आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा काल निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव यांनी केली. 15 जणांच्या संघात यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यर यांना स्थान न मिळाल्यानं सर्वत्र चर्चा झाली. भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंग यानं भारतीय क्रिकेट संघ आशिया कपमध्ये जयस्वाल आणि श्रेयस अय्यर पेक्षा मोहम्मद सिराजला मिस करेल असं म्हटलं.

मोहम्मद सिराजनं इंग्लंड दौऱ्यावर दमदार कामगिरी केली मात्र त्याला आशिया कप साठी संघात स्थान देण्यात आलं नाही. सिराजनं इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी मॅचमध्ये 23 विकेट घेतल्या. हरभजन सिंग म्हणाला की सिराजनं इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत खूप गोलंदाजी केली. आता त्याला पुरेसा आराम मिळाला आहे. निवड समितीच्या सदस्यांनी त्याला निवडलं असतं तर संघ मजबूत झाला असता.

हरभजन सिंग त्याच्या यूट्यूब चॅनेलवर म्हणाला की मला वाटतं मोहम्मद सिराजला संघात घ्यायला पाहिजे होतं. सिराजनं इंग्लंड विरुद्ध चांगली गोलंदाजी केली होती. सिराजला संघात घेतलं असतं तर टीम इंडिया मजबूत दिसली असती. संघाची गोलंदाजी आणखी भक्कम झाली असती. हरभजन सिंग पुढं म्हणाला की भारत मोहम्मद सिराजच्या एक्स फॅक्टरला मिस करणार आहे.

हरभजन सिंग पुढं म्हणाला की श्रेयस अय्यरला संघात स्थान मिळेल अशी आशा होती. त्यानं आयपीएलमध्ये मध्ये खूप धावा केल्या, तो शानदार फॉर्ममध्ये होता. मला वाटलं त्याला संघात घेतलं जाईल, मात्र श्रेयस अय्यर नाव संघात नसल्यानं धक्का बसला, असं हरभजन सिंग म्हणाला.

आशिया कपसाठी भारताचा संघ  (Asia Cup India Squad)

सूर्यकुमार यादव (कॅप्टन), शुभमन गिल (उपकॅप्टन ), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा आणि रिंकू सिंग

आशिया कप 2025 – संपूर्ण वेळापत्रक (ग्रुप स्टेज) (Asia Cup 2025 Full Schedule)

9 सप्टेंबर – अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग
10 सप्टेंबर – भारत विरुद्ध यूएई
11 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग
12 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध ओमान
13 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका
14 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान
15 सप्टेंबर – यूएई विरुद्ध ओमान
15 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग
16 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
17 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध यूएई
18 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
19 सप्टेंबर – भारत विरुद्ध ओमान

सुपर-4 आणि अंतिम सामना
20 सप्टेंबर – बी1 विरुद्ध बी2
21 सप्टेंबर – ए1 विरुद्ध ए2
23 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी1
24 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी2
25 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी2
26 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी1
28 सप्टेंबर – अंतिम सामना

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.