Kho Kho WC 2025: टीम इंडियाचा बॅक टू बॅक विजय, दुसऱ्या सामन्यात ब्राझीलला लोळवलं

खो-खो विश्वचषक 2025 स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने त्यांच्या दुसऱ्या सामन्यात ब्राझीलचा 64-34 च्या मोठ्या फरकाने पराभव केला. या विश्वचषकात पुरुष संघाचा हा सलग दुसरा विजय आहे. सर्व 12 खेळाडूंनी आक्रमण आणि बचावात उत्कृष्ट कामगिरी दाखवली. प्रतीक वायकरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सर्वस्व पणाला लावून जागतिक स्तरावर देशाचा झेंडा फडकवून पुन्हा एकदा भारतीयांचे मनोबल उंचावले आहे.

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास टीम इंडियाने सुरुवातीपासूनच विरोधी संघावर वर्चस्व गाजवले होते. कर्णधार प्रतीक वायकरने नाणेफेक गमावली, त्यानंतर ब्राझीलच्या कर्णधाराने त्याला बचाव करण्यास सांगितले. भारताने पहिल्या डावापासून ब्राझीलला बॅकफूटवर ढकलले होते. जबरदस्त डिफेंसमुळे भारताला पहिल्या डावात 16 गुणांवर रोखण्यात यश आले होते. पहिल्या डावात ब्राझीलने अटॅक केला आणि भारत डिफेंसिव्ह भूमिकेत होता. भारताच्या पाच बॅच बाद करण्यात ब्राझीलला यश आलं. तर सहाव्या बॅचमधील एका खेळाडूला बाद केले. भारताने पहिल्याच डावात डिफेंस करताना दोन गुण मिळवले. त्यामुळे भारताची पकड घट्ट झाली होती.

दुसऱ्या डावात भारताने अटॅक करताना 34 गुणांची कमाई केली. तसेच एकच डिफेंस गुण ब्राझीलला दिला आहे. तिसऱ्या डावात भारताने पुन्हा एकदा ब्राझीलला झुंजवले. त्यामुळे तिसऱ्या डावातच भारताचा विजय पक्का झाला होता. भारताने फक्त 18 गुण दिले. तर डिफेंसच्या माध्यमातून 2 गुण मिळवले होते. त्यामुळे तिसऱ्या डावातील फरक विजयासाठी पक्का होता. त्यामुळे चौथ्या डावात ब्राझील तगडा डिफेंस करणे भाग होते. पण ते काही शक्य नाही हे आधीच कळलं होते. तरी भारतीने चौथ्या डावात एकही डिफेंस गुण न देता अटॅक करताना 26 गुण मिळवले. यासह चार डावात भारताने 64 गुणांची कमाई केली. तर ब्राझीलला फक्त 34 गुण मिळवता आले. भारताने हा सामना 30 गुणांनी जिंकला.

भारतीय पुरुष संघाचा तिसरा सामना आज बुधवार 15 जानेवारी रोजी पेरूविरुद्ध होईल. प्रतीक वायकरची टीम इंडिया ही मॅच जिंकून क्वार्टर फायनलमध्ये आपले स्थान पक्के करू इच्छिते. भारतीय पुरुष संघ अ गटात आहे. भारताव्यतिरिक्त, या गटात नेपाळ, ब्राझील, भूतान आणि पेरूसह एकूण 5 संघांचा समावेश आहे. अव्वल 2 संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील.

हेही वाचा-

टीम इंडियाच्या या खेळाडूंचे देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन निश्चित, विराट कोहलीही खेळणार?
टी20 मालिकेत निवड झाली नाही म्हणून या संघाकडून खेळणार रिषभ पंत, चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी मोठा निर्णय
भारताचा ‘हा’ स्टार खेळाडू रणजी ट्राॅफी खेळण्यासाठी सज्ज

Comments are closed.