वर्ल्डकप 2027 साठी टीम इंडियाचा मोठा प्लॅन तयार, 8 नव्या मालिकांमध्ये रंगणार जबरदस्त सामना
भारतीय संघाने 2027 च्या वनडे वर्ल्डकपची तयारी आत्तापासूनच सुरू केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपासूनच या मोहिमेला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाने या स्पर्धेला लक्षात घेऊन रोहित शर्माच्या जागी युवा शुबमन गिलला कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. मुख्य निवडकर्ता अजीत अगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे दोघेही या आयसीसी स्पर्धेच्या तयारीवर भर देत संघ घडवत आहेत. या मोठ्या स्पर्धेसाठी भारत तब्बल 8 वनडे मालिका खेळणार आहे.
दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली 2027 च्या वनडे वर्ल्डकपपूर्वी 8 वनडे मालिका खेळू शकतात. याची सुरुवात 30 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेपासून होणार आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ जानेवारी महिन्यात घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. त्यानंतर जून महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध आणि जुलै महिन्यात इंग्लंडविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका होईल. या सर्व मालिकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाच वर्ल्डकप संघात स्थान मिळण्याची संधी असेल.
Comments are closed.