दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाच्या निवडीवर 5 मोठ्या गोष्टी समोर! जाणून घ्या सविस्तर

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. ही मालिका 14 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, यात स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत (Rishbh Pant) खेळताना दिसणार आहे. इंग्लंड दौऱ्यातील चौथ्या कसोटीदरम्यान पंत जखमी झाला होता, त्यामुळे त्याला जवळपास तीन महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागले. मात्र आता तो पूर्णपणे फिट झाला असून पुन्हा मैदानात उतरण्यास तयार आहे.

विशेष म्हणजे, पंतला या मालिकेसाठी संघाचा उपकर्णधार देखील करण्यात आलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त, वेगवान गोलंदाज आकाशदीपचंही कसोटी संघात पुनरागमन झालं आहे.

शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील या संघात के.एल. राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल आणि ध्रुव जुरेल या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. अष्टपैलू विभागात रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि नितीश कुमार रेड्डी यांची निवड झाली आहे. गोलंदाजी विभागात कुलदीप यादव स्पिन आक्रमणाची जबाबदारी सांभाळणार आहे, तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या जोडीवर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असेल.

दरम्यान, अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohmmed Shami) पुन्हा एकदा संघात स्थान मिळालेले नाही. सध्या शमी रणजी ट्रॉफीत खेळत असून सातत्याने चांगले प्रदर्शन करत आहे, तरीही त्याला कसोटी संघात संधी मिळालेली नाही.

Comments are closed.