कुलदीप यादव बाहेर, बुमराहची एंट्री! पहिल्या टी-20 सामन्यात अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेनंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 29 ऑक्टोबरला होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग 11 मध्ये काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. पहिल्या सामन्यात कुलदीप यादवला (Kuldeep yadav) संघाबाहेर ठेवले जाऊ शकते, तर जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

पहिल्या टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा (Shubman gill & Abhishek Sharma) या जोडीला ओपनिंगची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. या दोघांनी आशिया कप 2025 (Asia Cup 2025) मध्ये भारताकडून सलामी फलंदाज म्हणून खेळले होते. अभिषेकने त्या स्पर्धेत शानदार कामगिरी केली होती. मात्र, हा त्याचा ऑस्ट्रेलिया दौर्‍यावरील पहिला टी-20 सामना असेल.

मधल्या फळीत सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरण्याची शक्यता आहे. चौथ्या क्रमांकावर तिलक वर्मा आणि शिवम दुबे (Tilak Verma & Shivam Dube) खेळू शकतात. लोअर मिडल ऑर्डरमध्ये शिवम दुबे सोबत संजू सॅमसनचेही (Sanju Samson) महत्त्वाचे योगदान अपेक्षित आहे. त्याचबरोबर अक्षर पटेल (Axar Patel) फिनिशरची भूमिकाही पार पाडू शकतो.

गोलंदाजी विभागात एक मोठा बदल पाहायला मिळू शकतो. स्पिनर कुलदीप यादवला विश्रांती देण्यात येऊ शकते आणि त्याच्या जागी अक्षर पटेलला संधी मिळण्याची शक्यता आहे, कारण अक्षर फलंदाजीतही महत्त्वाची भूमिका निभावतो. त्याचप्रमाणे मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीलाही संधी मिळू शकते. वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह आणि हर्षित राणा या तिघांना अंतिम संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

पहिल्या टी-20 साठी भारताची संभाव्य प्लेइंग 11: अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.

Comments are closed.