शुभमन गिल की बुमराह; कोण होणार टीम इंडियाचा नवा कॅप्टन? BCCIकडून महत्त्वाची अपडेट

भारत चाचणी कर्णधार: भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा काही आठवड्यांवर येऊन ठेपलाय. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारतीय दौऱ्यासाठी भारताचा नवा कर्णधार कोण होणार? याची उत्सुकता वाढली आहे. यासंदर्भात कधी घोषणा होते याकडे क्रिकेटचाहत्यांचे लक्ष आहे. दरम्यान,बीसीसीआयकडून एक नवीन अपडेट समोर आलीय. बीसीसीआय आज (24 मे) रोजी एक बैठक बोलवणार आहे. या बैठकीत इंग्लंड दौऱ्यासाठी संघ (India Squad For England Tour) सोबतच नव्या कसोटी मालिकेसाठी कर्णधार कोण असणार याची घोषणा होण्याची शक्यता आहे. 20  जूनपासून भारत आणि इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. कसोटी कर्णधारपद कोणाला मिळणार याचा निर्णय बीसीसीआय कधी जाहीर करणार? कोणाची नावं आघाडीवर आहेत? जाणून घेऊया..

आज बीसीसीआयची बैठक

बीसीसीआय आज नव्या कर्णधाराबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती आज इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याशिवाय इंग्लंड दौरा भारतासाठी कठीण कसोटी असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, BCCI आज दुपारी 1.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. ज्यामध्ये कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाच्या घोषणेसह कर्णधाराचे नावही अंतिम केले जाऊ शकते. इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात 17 खेळाडूंचा समावेश केला जाऊ शकतो असे सांगितले जात आहे.

कोणाची नावं चर्चेत?

रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर त्याच्या जागी शुभमन गिल, जसप्रीत बुमराह या दोघांची नावे आघाडीवर आहेत.जसप्रीत बुमराह आणि केएल राहुल यांची नावे देखील चर्चेत आहेत.काही माध्यमांच्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराह वर्कलोड मॅनेजमेंटमुळे कर्णधारपदाच्या शर्यतीतून बाहेर पडू शकतो.इंग्लंडविरुद्धच्या  5 सामन्यांमध्ये तो खेळू शकणार नाही अशा बातम्यांनाही वेग आला आहे. त्यामुळे शुभमन गिलला नवा कसोटी कर्णधार आणि ऋषभ पंतला उपकर्णधार म्हणून घोषित केले जाऊ शकते अशी चर्चा आहे.

शुभमन गिलची IPL मध्ये प्रभावी कामगिरी

शुभमन गिलनं आयपीएल 2025 मध्ये त्याच्या कर्णधारपदाने क्रिकेटप्रेमींसह जाणकारांनाही प्रभावीत केलं आहे. गेल्या सिझनमध्ये त्याचा संघ चांगली कामगिरी करून शकला नाही. पण आयपीएल 2025 मध्ये गुजरात टायटन्सने प्रवेश केल्यानंतर, या सिझनमध्ये केवळ कर्णधारच नाही तर शुभमन गिलची वैयक्तिक कामगिरीही चांगली राहिली आहे.आतापर्यंत 13 सामन्यांमध्ये 636 धावा केल्या आहेत. गिल ऑरेंज कॅप जिंकण्यापासून फक्त 3 धावा तो दूर आहे.

हे ही वाचा:

SRH vs RCB IPL 2025 : हैदराबादविरुद्ध बंगळुरूचा लाजिरवाणा पराभव! गुणतालिकेत मोठी उलटफेर, बंगळुरू तिसऱ्या क्रमांकावर घसरली अन्…

अधिक पाहा..

Comments are closed.