टी20 विश्वचषक 2026 साठी टीम इंडिया सज्ज? या खेळाडूंनी वाढवलं चिंतेचं कारण

ऑस्ट्रेलिया दौरा आता संपला आहे. या दौऱ्यानंतर टीम इंडियाने टी20 विश्वचषक 2026 ची तयारीही सुरू केली आहे. टी20 फॉरमॅटची सध्याची विश्वविजेती टीम असल्याने भारतावर आता जेतेपद टिकवण्याचं मोठं दडपण असणार आहे.

कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar yadav) आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ( Head Coach Gautam Gambhir) यांना लवकरात लवकर आपला अंतिम संघ तयार करावा लागणार आहे. मात्र ऑस्ट्रेलिया दौरा संपल्यानंतर टीम इंडियासमोर काही अडचणी उभ्या राहिल्या आहेत, त्यामुळे भारताला आता दुप्पट मेहनत घ्यावी लागणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेदरम्यान भारताला मोठा धक्का बसला, जेव्हा कर्णधार सूर्यकुमार यादवची कामगिरी काही प्रभावी ठरली नाही. सूर्या बराच काळ मोठी खेळी करू शकलेला नाही. त्यामुळे टी20 विश्वचषकाच्या आधी त्याचा फॉर्म संघासाठी मोठा चिंतेचा विषय ठरत आहे.

जसप्रीत बुमराहदेखील (Jasprit Bumrah) या मालिकेत पूर्ण लयीत दिसला नाही. त्यामुळे त्याने लवकरात लवकर फॉर्ममध्ये परत येणं अत्यंत गरजेचं आहे. संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्या बॅटमधूनही या मालिकेत फरश्या धावा आल्या नाहीत.

Comments are closed.