IND vs ZIM: टीम इंडियाच्या फलंदाजांचं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर! मोठ्या सामन्यांपूर्वीच सर्व फलंदाज फार्मात

चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर भारतीय संघ सुपर-8 चा आपला दुसरा सामना खेळत आहे (Ind vs Zim). या सामन्यात जिम्बाब्वेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण भारतीय फलंदाजांनी या संधीचा फायदा घेत 20 षटकांत 4 गडी गमावून 256 धावांचा डोंगर उभा केला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात शिवम दुबे वगळता सर्व फलंदाज अपयशी ठरले होते, पण आज मात्र इतर फलंदाजांनी दुबेची गरजच पडू दिली नाही आणि मैदानावर चौफेर फटकेबाजी केली.
गेल्या काही सामन्यांत अपयशी ठरलेल्या अभिषेकने 30 चेंडूत 55 धावा ठोकून दमदार कमबॅक केले. तसेच संजू सॅमसनने 24 धावांची आक्रमक खेळी केली, तर ईशान किशनने 38 धावांचे महत्त्वाचे योगदान दिले. याचबरोबर कर्णधार सूर्यकुमार यादवने अवघ्या 13 चेंडूत 33 धावा करत आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट मध्ये 4000 धावांचा टप्पा पार केला.
सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या यांनी झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची दाणादाण उडवली. गेल्या काही सामन्यांपासून संघर्ष करणाऱ्या तिलक वर्माने आज फक्त 16 चेंडूत नाबाद 44 धावा केल्या. तर हार्दिक पांड्याने आपले फॉर्ममध्ये असल्याचे सिद्ध करत 23 चेंडूत अर्धशतक झळकावले. या दोघांनीही प्रत्येकी 4-4 गगनचुंबी षटकार खेचले.
Comments are closed.