IND vs ZIM: कर्णधार सूर्यकुमार यादवचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भीमपराक्रम! 148 व्या सामन्यात गाठला खास टप्पा

टी-20 विश्वचषक 2026 मधील (icc T20 international world cup 2026) सुपर-8 च्या महत्त्वाच्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेविरुद्ध धावांचा पाऊस पाडला. चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 खेळाडू गमावून 256 धावांचा स्कोअर उभा केला.
सलामीवीर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma and Hardik pandya) आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांनी झळकावलेल्या अर्धशतकांमुळे भारताला ही मजल मारता आली.
या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) अवघ्या 13 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 33 धावांची झंझावाती खेळी केली. जरी त्याचे अर्धशतक हुकले असले, तरी या खेळीच्या जोरावर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. सूर्याने आतापर्यंत 148 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 140 डावांत 34.1 च्या सरासरीने 4024 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 4 शतके आणि 29 अर्धशतके आहेत.
बऱ्याच काळानंतर स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या जुन्या लयीत दिसला. त्याने अवघ्या 23 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 50 धावा केल्या. त्याला तिलक वर्माने (Tilak Verma) मोलाची साथ दिली. फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करून वरच्या क्रमांकावर आलेल्या तिलकने 16 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या जोरावर नाबाद 44 धावांची धडाकेबाज खेळी केली.
Comments are closed.