जयस्वालला मिळणार विश्वविक्रमाची संधी! टीम इंडियाचे 'हे' स्टार्स रचणार इतिहास

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका 20 जूनपासून सुरू होत आहे. पहिला कसोटी सामना लीड्समध्ये खेळला जाणार आहे. या मालिकेदरम्यान केएल राहुल, शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना त्यांच्या कारकिर्दीत एक मोठा विक्रम रचण्याची संधी असेल.

गिलला टेस्टमध्ये 2000 धावा पूर्ण करण्याची संधी असेल. कसोटी मालिकेदरम्यान 88 धावा काढल्यानंतर भारतीय कसोटी कर्णधार त्याच्या कारकिर्दीत 2000 धावा पूर्ण करेल.

यशस्वी जयस्वाल कडे देखील इतिहास रचण्याची संधी असेल. गिलच्या कसोटीत 2000 धावा आणि यासोबत सर्वात जलद जास्तीत जास्त 50 षटकार करण्याची संधी असेल. जयस्वालने कसोटी क्रिकेटमध्ये 19 सामने खेळले आणि एकूण 1798 धावा केल्या, जर तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 202 धावा करू शकला तर तो भारतासाठी कसोटीत 2000 धावा करणारा सर्वात जलद फलंदाज बनेल. गिल 11 षटकार मारून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50 षटकार मारणारा फलंदाज बनेल. जयस्वाल कसोटीत 3000 आंतरराष्ट्रीय धावांपासून 464 धावा दूर आहे. 43 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 59 डावांमध्ये, जयस्वालने 46.10 च्या सरासरीने 2536 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये पाच शतके आणि 15 अर्धशतके आहेत.

केएल राहुल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 9000 धावा पूर्ण करण्यापासून फक्त 435 धावा दूर आहे. राहुलने सराव सामन्यांमध्ये 116 आणि 51 धावा केल्या आहेत. राहुलने आतापर्यंत 17 आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. केएल राहुलसाठी ही मालिका खूप महत्त्वाची असणार आहे.

उपकर्णधार रिषभ पंत 3000 कसोटी धावांच्या जवळ पोहोचला आहे, त्याला फक्त 52 धावांची आवश्यकता आहे. पंत ने असे केले तर तो भारतासाठी कसोटीत 3000 पेक्षा जास्त धावा करणारा दुसरा खेळाडू बनेल. सध्या धोनीच्या नावावर भारतासाठी कसोटीत 3000 पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम आहे.

इतिहास रचण्याच्या शर्यतीत बुमराह देखील आहे. दोन विकेट घेतल्याने बुमराह वसीम अक्रमचा विक्रम मोडेल आणि आशियातील सर्वोत्तम गोलंदाज बनेल. बुमराह सध्या देशात सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

6691आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या रवींद्र जडेजाला 7000 धावांचा टप्पा ओलांडण्याची संधी आहे. 309 धावांसह, जडेजा 7000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करेल.

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज देखील त्याच्या कारकिर्दीतील एक खास टप्पा गाठण्याच्या जवळ पोहोचलेला आहे. सिराज जवळ 200 आंतरराष्ट्रीय विकेट्स पूर्ण करण्याची संधी असेल. सिराजला हे करण्यासाठी आणखी 15 विकेट्सची आवश्यकता आहे. सिराजने आतापर्यंत 96 सामन्यांमध्ये 28.28 च्या सरासरीने 185 विकेट्स घेतल्या आहेत.

Comments are closed.