IND vs NZ: फायनलपूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! ‘या’ दोन खेळाडूंमुळे स्वप्न भंगणार?

आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंडचे संघ भिडण्यासाठी सज्ज झाले आहेत. (८ मार्च) रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात हा महामुकाबला खेळवला जाईल. मात्र, फायनलपूर्वी टीम इंडियाच्या दोन खेळाडूंनी भारताच्या चिंतेत भर घातली आहे. हे दोन खेळाडू गेल्या अनेक दिवसांपासून फॉर्ममध्ये नसल्याचे (आउट ऑफ फॉर्म) दिसत आहेत. आम्ही अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्ती यांच्याबद्दल बोलत आहोत.

च्याअभिषेक शर्माची बॅट टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये आतापर्यंत तशी चाललेली नाही, ज्यासाठी तो ओळखला जातो. आतापर्यंत खेळलेल्या ७ सामन्यांत अभिषेक शर्माने १२.७१ च्या खराब सरासरीने केवळ ८९ धावा केल्या आहेत. याशिवाय, वरुण चक्रवर्तीची खराब कामगिरीही सुरूच आहे. त्याने गेल्या ४ सामन्यांत ४६ च्या सरासरीने धावा खर्च केल्या आहेत. या दोन खेळाडूंच्या फॉर्ममुळे भारताच्या अडचणी वाढल्या आहेत.

Comments are closed.