IND vs BAN: टीम इंडिया करणार बांगलादेश दौरा! वनडे आणि टी-20 सामन्यांचं वेळापत्रक समोर

गेल्या वर्षी स्थगित झालेला भारतीय संघाचा बांगलादेश दौरा आता ऑगस्ट-सप्टेंबर 2026 मध्ये होणार असल्याची घोषणा बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) शुक्रवारी केली आहे. या दौऱ्यात 3 वनडे (एकदिवसीय) आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाईल. (IND vs BAN)

सध्या बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या हिंसाचाराच्या विरोधात भारतात संतापाची लाट आहे. यामुळेच बांगलादेशी खेळाडूंना आयपीएलमध्ये स्थान देण्यावरही टीका होत आहे. या सर्व वादाच्या दरम्यान, बीसीबीचे क्रिकेट ऑपरेशन इंचार्ज शहरियार नफीस यांनी माहिती दिली की, भारत आणि बांगलादेश दरम्यानची जी मालिका आधी स्थगित झाली होती, तिचे आता नव्याने नियोजन करण्यात आले आहे.

रिपोर्टनुसार, भारतीय संघ 28 ऑगस्ट 2026 रोजी बांगलादेशात पोहोचेल. वनडे सामने 1, 3 आणि 6 सप्टेंबर रोजी खेळले जाणार आहेत., तर टी-20 सामने 9, 12 आणि 13 सप्टेंबर रोजी होणार आहेत.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने 206 च्या घरगुती हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकांचा समावेश आहे.

पाकिस्तान संघ 9 मार्चला बांगलादेशात येणार असून 12 ते 16 मार्च दरम्यान 3 वनडे सामने खेळणार आहे. तर, न्यूझीलंड संघ एप्रिल-मे मध्ये बांगलादेश दौऱ्यावर येणार असून 3 वनडे आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

Comments are closed.