तेलंगणा रोड अपघात – रंगारेड्डीमध्ये TSRTC बस-डंपरच्या भीषण धडकेत 19 ठार

तेलंगणा रस्ता अपघात: काल रात्री जोधपूरच्या फलोदी जिल्ह्यातील माटोडा परिसरात भाविकांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलरला धडकल्याने मोठा अपघात झाला. यात अठरा जणांचा जागीच मृत्यू झाला. आता, तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात एक मोठा रस्ता अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे.
TSRTC बस आणि डंपर यांच्यात झालेल्या धडकेत १९ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खानापूर परिसरात हा अपघात घडल्याने सर्वत्र घबराट पसरली आहे.
सायबराबाद आयुक्तालयाच्या हद्दीतील रंगारेड्डी येथे सोमवारी एक भीषण रस्ता अपघात झाला. १९ जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. शेवेल्ला विभागातील खानापूर गेटजवळ ही धडक झाली. चुकीच्या मार्गाने जात असलेल्या भरधाव ट्रकची TGRTC प्रवासी बसला समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला.
हा अपघात इतका भीषण होता की अनेक प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर काही जण गंभीर जखमी झाले. परिवहन मंत्री पोन्नम प्रभाकर यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ मदत उपाययोजना करण्याचे आणि जखमींवर उच्च दर्जाचे उपचार करण्याचे निर्देश दिले.
आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल…
या भीषण अपघातानंतर तात्काळ आपत्कालीन पथके दाखल झाली. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. अपघाताची संपूर्ण माहिती तातडीने देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
बीआरएस प्रमुख केसीआर यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र शोक व्यक्त केला आणि सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले. माजी मंत्री आणि बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष केटीआर यांनी देखील 17 लोकांच्या मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. त्यांनी जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Comments are closed.