तेलंगणा राज्य नक्षलमुक्त आहे.

अंतिम मोहिमेत 42 नक्षलींचे आत्मसमर्पण : डीजीपींची घोषणा

न्यूज एजन्सी/ हैदराबाद

तेलंगणामध्ये शनिवारी 42 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यामध्ये शेवटचा नक्षलवादी कमांडर सोधी केशा याचा समावेश आहे. त्याने शस्त्रास्त्रांच्या साठ्यासह आत्मसमर्पण केल्यानंतर डीजीपी बी. शिवधर रे•ाr यांनी राज्य नक्षलमुक्तीची घोषणा केली. तेलंगणा राज्य आता पूर्णपणे नक्षलमुक्त झाले आहे. 2024 पासून 761 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सरकार त्यांना आर्थिक मदत आणि पुनर्वसन सुविधा पुरवत आहे. नुकत्याच झालेल्या अखेरच्या आत्मसमर्पण मोहिमेत सोधी केशा याने 36 शस्त्रs, दारुगोळा आणि 800 ग्रॅम सोनेही सुपूर्द केल्याचे त्यांनी सांगितले.

तेलंगणामध्ये 42 नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणानंतर राज्य नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहे. या नक्षलवाद्यांनी पाच एके-47 रायफल्स, चार एसएलआर रायफल्स, दोन इम्प्रोव्हाइज्ड ग्रेनेड्स, 1,000 हून अधिक काडतुसे आणि 800 ग्रॅम सोन्यासह आत्मसमर्पण केले आहे, तेलंगणाचे पोलीस महासंचालक बी. शिवधर रे•ाr यांनी स्पष्ट केले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी विविध भागांमध्ये पेरलेले आयईडी शोधून काढण्यासाठी आणि ते हटवण्यासाठी पोलीस त्यांची मदत घेत आहेत. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जात आहे. आता ते त्यांच्या नातेवाईकांना व मित्रांना भेटू शकतात तसेच प्रसारमाध्यमांशी संवाद साधू शकतात. 2024 ते 2026 या कालावधीत 761 नक्षलवाद्यांनी 302 शस्त्रांसह तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली.

Comments are closed.