अमेरिकेमध्ये पोलिस गोळीबारात तेलंगणा तरुणांनी ठार मारले

मृतदेह मायदेशी आणण्यासाठी कुटुंबीयांची विनंती

वृत्तसंसथा/ मेहबूबनगर

तेलंगणातील एका युवकाची अमेरिकेत गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. आता या युवकाचा मृतदेह मायदेशी आणण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी केंद्र सरकार तसेच तेलंगणा सरकारकडून मदत मागितली आहे. हा युवक 2016 पासून अमेरिकेत राहत होता. मेहबूबनगर येथील रहिवासी निजामुद्दीन 2016 साली फ्लोरिडा येथील कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत गेला होता. अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर निजामुद्दीनने तेथील कंपनीत काम करण्यास सुरुवात केली होती. तर पदोन्नतीनंतर तो कॅलिफोर्नियात स्थलांतरित झाला होता.

निजामुद्दीनची कॅलिफोर्नियात गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची माहिती गुरुवारी मिळाल्याचे त्याचे वडिल मोहम्मद हसनुद्दीन यांनी सांगितले. त्यांनी निजामुद्दीनचा मृतदेह भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारकडून मदत मागितली आहे.  निजामुद्दीनने रुममेटवर चाकूने हल्ला केला होता. ज्यानंतर तेथे पोहोचलेल्या पोलिसांच्या कारवाईत तो मारला गेल्याचे समोर आले आहे.

Comments are closed.