अमृतसरमध्ये सीता आणि लवकुशची मंदिरे बांधली जातील

अयोध्येतून परतल्यावर केजरीवाल यांची घोषणा

वृत्तसंस्था, अमृतसर

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठी घोषणा केली आहे. अमृतसर येथे सीतामाता आणि लवकुश यांचे भव्य मंदिर उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. अमृतसरच्या पावनगरीत भगवान वाल्मिकी मंदिरानजीक लव-कुश आणि सीतामातेचे भव्य आणि दिव्य मंदिर उभारण्यात येईल असे त्यांनी म्हटले आहे. केजरीवाल हे अलिकडेच अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेऊन परतले आहेत.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत केजरीवालांनी ही घोषणा केली आहे. अमृतसरला जगातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक मानतो. येथे प्रत्येक धर्माचे लोक आणि संस्था आहेत. दरबार साहिब येथेच आहे, सर्व धर्म आणि जगभरातील लोक येथे श्रद्धा आणि प्रार्थनेसाठी येतात, स्वत:च्या दु:खांपासून दिलासा मिळवितात आणि शांतता प्राप्त करतात. दुर्गियाना मंदिरही येथेच आहे, जालियांवाला बाग आणि वाघा बॉर्डरही येथेच असल्याचे केजरीवालांनी म्हटले आहे.

सीतामाता येथेच वाल्मिकी आश्रमात आल्या होत्या, लव-कुश यांचा जन्म येथेच झाला होता. सर्व धर्मांसाठी हे अत्यंत पवित्र ठिकाण आहे, खासकरून हिंदू धर्म, वाल्मिकी समाजासाठी हे अत्यंत मोठे श्रद्धास्थान आहे. जेथे भगवान वाल्मिकी यांचे तीर्थक्षे आहे, त्याच्यानजीकच सीतामाता आणि लव-कुश यांचे भव्य मंदिर उभारण्यात येईल असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

अकाल तख्तसमोर हजर राहणार मंत्री

श्री अकाल तख्त साहिबकडून आप मंत्री अणि आमदारांना बोलाविण्यात आल्याप्रकरणी मुख्यमंत्री मान यांनी भूमिका स्पष्ट केली. पक्ष अकाल तख्त साहिबच्या सर्वोच्चतेचा सन्मान करतो. याचमुळे ज्या मंत्री आणि आमदारांना बोलाविण्यात आले आहे, ते सर्व निर्धारित वेळेत श्री अकाल तख्त साहिबसमोर उपस्थित राहतील आणि लेखी जबाबही सोपवतील. जो निर्णय दिला जाईल, तो पूर्ण श्रद्धा आणि सन्मानासह स्वीकारण्यात येईल. मला वैयक्तिक स्वरुपात बोलाविण्यात आलेले नाही, याचमुळे सरकारची बाजू पक्षाचे मंत्री आणि आमदार मांडतील असे मुख्यमंत्री मान यांनी सांगितले आहे.

Comments are closed.