मध्य रेल्वेच्या सहा स्थानकांत प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती बंदी; दिवाळी, छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

येत्या दिवाळी आणि छठ पूजा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या सहा स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध लादले आहेत. प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी आणि सुरळीत प्रवास सुनिश्चित करण्यासाठी मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण आणि पनवेल या स्थानकांवर 16 ऑक्टोबर 2025 ते 28 ऑक्टोबर 2025 पर्यंत प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर निर्बंध लागू राहतील. तथापि, रेल्वे मंडळाच्या मार्गदर्शनानुसार, वरिष्ठ नागरिक, आजारी प्रवासी, मुले आणि मदतीची आवश्यकता असलेल्या महिला प्रवाशांना प्लॅटफॉर्म तिकीट जारी केले जाईल.

Comments are closed.