पालिकेची उद्याने, मैदाने आणि भूखंड कंत्राटदारांच्या हाती! देखभालीसाठी निविदा जाहीर, लोकप्रतिनिधींचा विरोध डावलला

दर्जेदार सुविधांसाठी मुंबई महानगरपालिकेची उद्यान, मैदाने आणि भूखंडांची पालिकेने स्वतः देखभाल करावी अशी मागणी तत्कालीन नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींनी केली असताना आता शेकडो उद्याने, मैदाने आणि भूखंड देखभालीसाठी खासगी कंत्राटदाराला देण्याचा घाट पालिकेने घातला आहे. यासाठी निविदाही जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत 7 मार्च 2022 रोजी संपल्यानंतर पालिकेचा कारभार प्रशासकाच्या माध्यमातून सुरू आहे. तीन वर्षांपासून निवडणुका रखडल्याने नगरसेवक नसल्याने पालिका प्रशासनाकडून मनमानीपणे निर्णय घेतले जात असल्याचा आरोप सर्वच पक्षांकडून केला जात आहे. यामध्ये आता लोकप्रतिनिधींनी विरोध केलेले धोरण पुन्हा राबवण्याचा घाट पालिकेने घातला आहे. यासाठी पालिकेने ई-टेंडर काढले आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी नगरसेवक नसल्याचा फायदा प्रशासनाकडून घेतल्याचा आरोपही केला जात आहे.
कंत्राटदारांना लाभ
कंत्राटदारांकडून मैदाने, उद्याने आणि भूखंडांचा बेसुमार व्यावसायिक लाभ घेतल्याचे समोर आल्यामुळेच लोकप्रतिनिधींनी कंत्राटदारांना विरोध केला होता. मात्र आता महापालिकेची घाटकोपर, मुलुंड आणि भांडुप परिसरातील सुमारे 250 उद्याने व मनोरंजन मैदाने 2027 पर्यंत कंत्राटदाराला देण्यात येणार आहेत.
भूखंडांची स्थिती
शहर विभाग 219 भूखंड
परळ ः 56 प्लॉट
दादर ः 45 प्लॉट
प्रभादेवी ः 54 प्लॉट
माटुंगा ः 64 प्लॉट
Comments are closed.