GT vs RR: गुजरात विरुद्ध राजस्थान सामन्यातून शुबमन गिल का झाला बाहेर? नेमकं कारण समोर

आयपीएल (IPL) 2026 चा 9 वा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यात खेळवला जात आहे. मात्र, या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी गुजरातच्या संघाला मोठा झटका बसला आहे. टीमचा नियमित कर्णधार शुबमन गिल (Shubman gill) या सामन्यात खेळत नाहीये. त्याच्या अनुपस्थितीत राशिद खान (Rashid Khan) संघाचे नेतृत्व करत आहे. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार रियान परागने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

टॉसच्या वेळी बोलताना हंगामी कर्णधार राशिद खानने सांगितले की, शुबमन गिलच्या स्नायूंना थोडी सूज किंवा ताण (Strain) जाणवत आहे. त्यामुळे तो या सामन्यात खेळू शकणार नाही. तो लवकरच बरा होऊन संघात परतेल अशी आम्हाला आशा आहे. गिलच्या जागी कुमार कुशाग्रला संघात स्थान देण्यात आले आहे.

राशिद खानने सांगितले की, आम्हालाही प्रथम गोलंदाजीच करायची होती, त्यामुळे टॉसच्या निकालावर आम्ही समाधानी आहोत. खेळपट्टी ताजी असून सुरुवातीला गोलंदाजांना मदत मिळेल असे वाटते. गेल्या सामन्यात आम्ही चांगले क्रिकेट खेळलो, पण फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांत अजून सुधारणेला वाव आहे. आम्ही रणनीतीवर चर्चा केली असून आता मैदानात 100% कामगिरी करण्यावर आमचा भर असेल.

Comments are closed.