मणिपूरमध्ये पुन्हा दगडफेकीनंतर तणाव वाढला आहे

वृत्तसंस्था/ इंफाळ

मणिपूरच्या चुराचंदपूर जिह्यात रविवारी रात्री परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली होती. संतप्त तरुणांच्या जमावाने एका प्रमुख कुकी समाजाच्या नेत्याच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर परिस्थिती चिघळली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांना अश्रुधूर सोडावा लागला. कुकी-झो कौन्सिलचे अध्यक्ष एच. थांगलेट यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येने तरुण जमल्यानंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली. थांगलेट यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चेसाठी बैठकीला उपस्थिती दर्शविल्यानंतर जमावाने घोषणाबाजी करत त्यांच्या निवासावर दगडफेक केली. तसेच घराच्या आवारात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क सुरक्षा दलांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि आंदोलकांना पांगवण्यासाठी तात्काळ कारवाई केली.

Comments are closed.