न्यूयॉर्क विमानतळावर भयानक अपघात, दोन विमानांची आपसात टक्कर, वाचा काय घडलं?

अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क शहरात एक मोठा विमान अपघात झाला. बुधवारी रात्री (१ ऑक्टोबर) विमानतळावर दोन विमानांची टक्कर झाली. विमाने लागार्डिया विमानतळावर पार्किंग करत असताना हा अपघात झाला. डेल्टा एअरलाइन्सच्या दोन्ही विमानांचे मोठे नुकसान झाले. एबीसी न्यूजच्या वृत्तानुसार, डेल्टा एअरलाइन्सचे एक विमान गेटजवळ येत असताना, दुसरे विमान लँडिंग केल्यानंतर गेटजवळ आले आणि दोघेही एकमेकांवर आदळले.
या झालेल्या अपघातात एका विमानाचा विंग तुटून दुसऱ्या विमानाच्या नाकाशी आदळला. धडक इतकी तीव्र होती की, एका विमानाचे विंग तुटून जमिनीवर पडले. एअर ट्रॅफिक कंट्रोलमधून मिळालेल्या ऑडिओवरून असे दिसून येते की वैमानिकांनी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला, परंतु तरीही अपघात झाला. या अपघातात एक व्यक्ती जखमी झाली.
न्यू यॉर्कमध्ये यापूर्वीही अनेक विमान अपघात झाले आहेत. नोव्हेंबर २००१ मध्ये, टेकऑफ दरम्यान एक विमान कोसळले. यात अंदाजे २६० लोकांचा मृत्यू झाला. जानेवारी २००९ मध्ये आणखी एक अपघात झाला. एका विमानाचे दोन्ही इंजिन निकामी झाले आणि विमान हडसन नदीत सुरक्षितपणे उतरवण्यात आले. या वर्षी १२ जून रोजी गुजरातची राजधानी अहमदाबादमध्ये एक मोठा विमान अपघात झाला. एअर इंडियाचे विमान कोसळले, यात २४१ लोकांचा मृत्यू झाला. एकूण २४२ प्रवासी या विमानामध्ये होते.
Comments are closed.