कल्याणच्या रायते पुलावर भयानक अपघात, इको टॅक्सी सिमेंट मिक्सर ट्रकला ओव्हरटेक करायला गेली अन्..

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर अपघात: कल्याण–मुरबाड-अहिल्यानगर मार्गावर आज सकाळच्या सुमारास हृदय पिळवटून टाकणारी भीषण दुर्घटना घडली. रायते पुलावर सिमेंट मिक्सर ट्रक आणि काळी-पिवळी इको टॅक्सी (Kalyan-Ahilyanagar Highway Accident) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात इको टॅक्सीतील सर्व ११ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ७ जण मुरबाडचे, १ कल्याणचा, १ साताऱ्याचा तर २ जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.(Kalyan-Ahilyanagar Highway Accident)

Kalyan-Ahilyanagar Highway Accident : इको टॅक्सीने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला अन्….

पोलिसांच्या माहितीनुसार, इको टॅक्सी कल्याणहून मुरबाडकडे प्रवासी घेऊन निघाली होती. रायते पुलावर एका बाजूचा रस्ता सुरू असल्याने दोन्ही दिशेची वाहतूक एकाच मार्गावर सुरू होती. याचदरम्यान इको टॅक्सीने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सर ट्रकला ती जोरात धडकली. धडकेची तीव्रता इतकी होती की टॅक्सीचा अक्षरशः चक्काचूर झाला.(Kalyan-Ahilyanagar Highway Accident)

Kalyan-Ahilyanagar Highway Accident :  टॅक्सी चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला…

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. टॅक्सीमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून जवळच्या गोवेली रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी सर्वांना मृत घोषित केले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, ओव्हरटेक करताना टॅक्सी चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. दरम्यान, पुलावर एकाच बाजूने वाहतूक सुरू केल्यामुळे प्रशासनाच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे तसेच या इको टेक्सी मध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करण्यात का येत होते असे अनेक प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्थानिकांनी दोन्ही बाजूचे रस्ते तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे.(Kalyan-Ahilyanagar Highway Accident)

Kalyan-Ahilyanagar Highway Accident : ओव्हरटेक करताना झालेल्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली

या घटनेबाबत दुःख व्यक्त करत मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले की, रस्ता रुंद असूनही ओव्हरटेक करताना झालेल्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली. तसेच या घटनेची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली असून मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. ही दुर्घटना पुन्हा एकदा महामार्गावरील बेदरकार वाहनचालना किती जीवघेणी ठरू शकते, याची जाणीव करून देणारी ठरली आहे.

Kalyan-Ahilyanagar Highway Accident : देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं दुःख

तर या घटनेबाबत दुःख व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मिडीयावरती पोस्ट करत म्हटलं की, राष्ट्रीय महामार्ग 61 वर कल्याणजवळ दोन वाहनांची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. स्थानिक प्रशासनाशी आम्ही संपर्कात आहोत.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.