दहशतवादी कारवाया सुरूच आहेत
त्रालमधील चकमकीत तिघांचा खात्मा : ड्रोन फुटेजद्वारे कारवाई
मंडळ/श्रीनगर
जम्मू काश्मीरमधील त्रालमध्ये गुरुवारी सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. हे तिन्ही दहशतवादी एका घरात लपले होते. सुरक्षा दलांनी ड्रोनच्या मदतीने त्यांना शोधून काढत त्यांचा सामना केला. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये टॉप कमांडर आसिफ शेखचाही समावेश होता. याशिवाय सुरक्षा दलांनी आमिर नझीर वाणी आणि अहमद भट यालाही ठार केले. दरम्यान, त्रालमध्ये मारला गेलेला दहशतवादी आमिर नझीर वाणीचा शेवटचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तो आपल्या आईशी बोलत आहे. आई आमिरला काश्मिरी भाषेत ‘बेटा, शरण जा’ असे म्हणताना निदर्शनास येत आहे. गेल्या तीन दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये ही दुसरी चकमक आहे. यापूर्वी, 13 मे रोजी शोपियान जिल्ह्यातील केलर येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे (एलईटी) तीन दहशतवादी मारले गेले होते. त्यानंतर बुधवारी केलरमधूनच मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रs जप्त करण्यात आली होती.
भारत-पाकिस्तान सीमेजवळ ड्रोन आढळला
भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या श्रीगंगानगर जिल्ह्यातील अनुपगडमध्ये गुरुवारी एक ड्रोन आढळला आहे. सकाळी 9:45 वाजता सीमेवरील संवेदनशील भागातील गाव 12-अ जवळील एका शेतात गावकऱ्यांना एक ड्रोन निदर्शनास आला. यासंबंधीची माहिती सुरक्षा दलाला दिल्यानंतर बीएसएफच्या पथकाने परिसराला वेढा घालत सदर ड्रोन ताब्यात घेतले.
Comments are closed.