कुपवाडा येथे दहशतवादी तळ उद्ध्वस्त
चिनी पिस्तूलसह हातबॉम्ब जप्त : सुरक्षा दलाला मोठे यश
मंडळ संस्था/श्रीनगर
पाकिस्तानमधील नियंत्रण रेषेपलीकडून कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांच्या नापाक योजना उधळून लावण्यासाठी केलेल्या मोठ्या कारवाईत सुरक्षा दलांनी उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिह्यात दहशतवादी लपण्याचे एक ठिकाण उद्ध्वस्त केले. सुरक्षा दलांनी या तळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला. या कारवाईदरम्यान संयुक्त पथकाने दहशतवाद्यांचा एक अ•ा नष्ट करताना चार मॅगझिनसह दोन एम4 मालिकेतील रायफल, तीन मॅगझिनसह दोन चिनी पिस्तूल, दोन हँडग्रेनेड आणि काही जिवंत गोळ्या जप्त केल्या. याप्रकरणी कलमाबाद पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
हंदवाडाच्या नौगाम सेक्टरमध्ये शुक्रवारी नियंत्रण रेषेजवळील नीरियन वन क्षेत्रात दहशतवाद्यांचा एक अ•ा उद्ध्वस्त केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याचा मोठा साठा जप्त केला. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई सुरू करण्यात आली होती. हंदवाडा पोलीस आणि भारतीय लष्कराच्या नौगाम ब्रिगेडने नौगाम सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळील नीरियन वन क्षेत्रात संयुक्त कारवाई सुरू केली होती.
सुरक्षा दल शांतता, सार्वजनिक सुरक्षा आणि ड्रग्ज आणि दहशतमुक्त समाज सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. आता ही शस्त्रs भारतीय हद्दीत आणणाऱ्यांना पकडणे आणि ज्या दहशतवादी गटाला ही शस्त्रs दिली जाणार होती त्यांना निक्रिय करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
Comments are closed.